Noida Crime News
Noida Crime NewsSaamtv

Noida Crime News: धक्कादायक! OYO हॉटेलवर प्रियकराला भेटायला गेली, परतलीच नाही; विवाहित महिलेसोबत घडले भयंकर...

Uttar Pradesh Crime News: प्रियकराचे लग्न होणार असल्याचे तिला समजले यावरुन या दोघांमध्ये मोठा वाद झाला.
Published on

Uttar Pradesh Crime News: अनैतिक संबंधांतून प्रियकराने विवाहित महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये ही खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रियकराने हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. मग दोघांमध्ये वाद झाला. वादानंतर प्रियकराने ही हत्या केल्याचे समोर आले आहे.

हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी महिलेच्या पतीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. महिलेला दोन मुलं असून, ती पतीसोबत नोएडात राहत होती. सोनू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Latest Marathi News)

Noida Crime News
Nandurbar News: तर रस्‍त्‍यांवर पसरणार अंधार; ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पथदिव्यांची २१९ कोटीची थकबाकी

याबाबत अधिक माहिती अशी की, ही महिला उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) इटावा येथील रहिवासी होती. ती नोएडामध्ये पती आणि 2 मुलांसह राहत होती. या महिलेचे सोनू नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते, जो महिलेचा दूरचा नातेवाईक आहे. गेल्या शुक्रवारी ही महिला आपल्या प्रियकराला सेक्टर-63 छिजारसी येथील एका OYO हॉटेलमध्ये भेटण्यासाठी गेली होती. याचवेळी महिलेला समजले की, प्रियकर सोनूचे आता लग्न होणार आहे. यावरुन महिला आणि प्रियकर सोनूमध्ये वाद सुरू झाला.

Noida Crime News
Narayan Rane On Sharad Pawar : शरद पवारांच्या 'त्या' विधानावर नारायण राणेंनी दिलं प्रत्युत्तर म्हणाले...

त्यांचा हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी सोनूने महिलेशी भांडण सुरू केले. यावेळी प्रचंड चिडलेल्या सोनूने महिलेच्या डोक्यावर एका जड वस्तूने प्रहार केला. ज्यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. यानंतर तो ओयो हॉटेलमधून फरार झाला. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी खोलीत प्रवेश केला असता महिलेचा मृतदेह बाथरूममध्ये पडलेला दिसला.

या धक्कादायक प्रकाराची पोलिसांना माहिती देण्यात आली. सेक्टर-63 कोतवाली पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि आरोपी प्रियकराला अटक केली, त्याची चौकशी सुरू आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com