Car Accident  Saam TV
देश विदेश

CCTV Footage : बेदर'कार'! भरधाव कारने फुटपाथवरुन चालणाऱ्या नागरिकांना चिरडलं; एकाचा मृत्यू, ४ जखमी

प्रविण वाकचौरे

Karnataka Car Accident :

कर्नाटकातील मंगळुरूमध्ये एका भरधाव कारने फूटपाथवरून चालणाऱ्या पाच जणांना उडवलंय. बुधवारी सायंकाळी कर्नाटकातील मंगलुरु येथे ही घटना घडली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका चिमुकलीचा समावेश आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घटनेनंतर आरोपी चालक फरार आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ देखील समोर आला आहे. बेदरकारपणे कार चालवणाऱ्या चालकाची ओळख पटली असून कमलेश बलदेव असं त्याचं नाव आहे. त्याच्यावर पोलिसांनी गु्न्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे.

सीसीटीव्हीतील दृष्यांनुसार, मन्नागुडा जंक्शनजवळ अनेक लोक फूटपाथवरून चालत असल्याचे दिसत आहे. लोकांना काही कळायच्या आतच मागून वेगाने सफेद रंगाची एक कार येते आणि फुटपाथवरुन चालणाऱ्या लोकांना चिरडते.

कार आधी तीन-चार महिलांना धडकते. कारची ही धडक एवढी जोरदार आहे की काही महिला अक्षरश: हवेत उडतात. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाला आदळून दिशा बदलते. ड्रायव्हर गाडी रस्त्यावर आणतो जिथे तो आणखी एका व्यक्तीला धडकतो. मात्र एवढा मोठा अपघात झाल्यानंतरही कार चालक न थांबता कार वेगाने पुढे घेऊन जातो.

पुढे जाऊन चालक कार एका शोरूमजवळ सोडून पळून गेला. पोलिसांनी याप्रकरणी कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

Maharashtra News Live Updates: दोन हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

SCROLL FOR NEXT