Why Wolf Become Man-Eaters 
देश विदेश

Man-Eaters Wolf: लांडगे बदला घेतात? युपीमधील लांडगे नरभक्षक का होत आहेत? काय म्हणतात तज्ञ

Why Wolf Become Man-Eaters: युपीमध्ये लांडग्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. लांडगे मोठ्या प्रमाणात लहान मुलांवर हल्ले करत आहेत. पण लांडगे नरभक्षक का बनलेत?

Bharat Jadhav

उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात लांगड्यांनी थैमान घातलंय. येथे लांडग्याच्या हल्ल्यात आतापर्यंत नऊ मुलांसह १० जणांचा मृत्यू झालाय. यामुळे येथील नागरिक भयभीत झालेलेत. नागरिकांना या भीतीतून दूर करत येथील सरकारने लांडग्यांना थेट मारण्याचे आदेश जारी केलेत. महाराष्ट्रात बिबट आणि मानव संघर्षाच्या घडत असतात. परंतु लांडग्यांनी थेट मानवावर हल्ला करणं. ते नरभक्षक बनणं या घटना नव्या आहेत. लांडगे बदला घेतात का असा प्रश्नही येथील नागरिक विचारत आहेत.

अख्या भारतात लांडग्यांची संख्या ३ हजार पेक्षा कमी आहे. यात उत्तर प्रदेशात १०० पेक्षा कमी लांडगे आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये लांडग्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. लांडग्यांना भारताच्या वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ मध्ये शेड्यूल १ प्रजाती म्हणून त्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे लांडग्याना संरक्षण दिलं जातं.

दरम्यान नॉर्वेजियन इन्स्टिट्यूट फॉर नेचर रिसर्च द्वारे 2002-2020 मध्ये जागतिक अभ्यास केला होता. यात लांडग्यांच्या हल्ल्याचा धोका "शून्यपेक्षा जास्त आहे, परंतु गणना करण्यासाठी खूपच कमी आहे" असे म्हटलं होतं. या अभ्यासात असे दिसून आले आहे की या कालावधीत जगभरात लांडग्यांकडून मानवांवर केवळ २६ प्राणघातक हल्ले झाले. त्यापैकी चार भारतात होते.

लांडगे नरभक्षक का बनले

मग युपीमधील बहराइच येथे लांडग्याचा कहर का? येथे लांडगे मानवावर मोठे प्रमाणात हल्ले का करत आहेत. अनेकांच्या मते, लांडगे हे बदला घेतात. परंतु आपण समजून घेतलं पाहिजे की, लांडगा हा मानवी वस्तीत राहणारा प्राणी आहे. लांडगा हा प्राणी त्याच्या अन्नासाठी मानवावर अवलंबून असतो. लांडगाचं प्रामुख्याने अन्न हे पाळीव प्राण्यांची शिकार करणं असतं. शेळ्या, ससे, आणि उंदीर यांसारख्या प्राण्याची शिकार करून ते आपले पोट भरत असतात. त्याचबरोबर ते मेलेल्या प्राण्यांचे मृतदेह खात असतात.

मग बहराइचच्या लांडगे मानवभक्षक कसे झाले? याबाबत बोलतांना IFS अधिकारी, वरिष्ठ वनपाल आणि दुधवा राष्ट्रीय उद्यानाचे माजी संचालक संजय पाठक यांनी एका वृत्त संस्थेला माहिती दिली की, लांडगे हा सर्वात हुशार प्राण्यांपैकी एक आहे. लांडग्यांमध्ये इतर मांसाहारी प्राण्यांपेक्षा वेगळं आणि आणखी भयंकर बनवण्याची प्रवृत्ती असते. तर काही वनपालांच्या मते, जंगलातील त्यांचा अधिवास संपल्यामुळे आणि त्यांना मानवच्या रक्तची आवड लागल्याने ते मानवभक्षक झाले असावेत.

बदला घेण्याची प्रवृत्ती

युपीमध्ये लांडगा आणि मानव संघर्षाच्या याआधीही दोन घटना घडल्या आहेत. यात १९९६ आणि २००३ मध्ये या घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत लांडग्यांनी १२ मुलांवर हल्ला केला होता.फक्त मुलांवरच लांडगे का हल्ला करत आहेत, याचं संशोधन केल्यानंतर एक वेगळंच सत्य समोर आलं होतं. काही शेतकऱ्यांना शेतात काम करतांना नदीजवळ उथळ गुहेत लांडग्यांची पिल्ले आढळली. मादी लांडग्यांच्या भीतीने त्या शेतकऱ्यांनी त्या पिल्लांना आगीत टाकले. त्यामुळे लांडगे संतप्त झाले, ते जवळपासच्या गावातील मुलांवर हल्ला करू लागले.

तर २००३ मध्ये बलरामपूर जिल्ह्यात,अशीच एक घटना नोंदवली गेली होती. तेथे लांडग्यांच्या पिल्ल्यांचे निवासस्थान शेतकऱ्यांनी नष्ट केलं होतं. त्यानंतर लांडगे लहान मुलांवर हल्ले करत होते. हे वन्यप्राण्याच्या जीवनात मानवाचा हस्तक्षेप झाल्याने या घटना घडत असल्याचं वनपाल अधिकारी सांगतात.

परंतु लांडगे मानवांवर हल्ला करतातच असे नाहीये. लांडगे ते शतकानुशतके एकाच प्रदेशात म्हणजेच मानवी वस्तीला लागून राहतात. तरीही ते मानवावर हल्ले करत नाहीत. पण एखाद्या वेळी जर चुकून एखाद्या लांडग्याने मुलाची शिकार केलीतेव्हा असे हल्ले होऊ शकतात. कारण त्यांच्या जीभेला लहान मुलांच्या रक्ताची चव लागून जाते, त्यामुळे ते लहान मुलांवर हल्ले करतात. मुलांचे मांस मऊ असते. इतर प्राण्यांच्या तुलनेत लहान मुलाची शिकार सहज सोपी असते. त्यामुळे लांडगा मनुष्यभक्षक बनू शकतात,” असं बहराइचचे विभागीय वन अधिकारी (डीएफओ), अजित प्रताप सिंग यांनी एका माध्यामाला सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT