Gondia News : अखेर वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव निलंबित, जाणून घ्या प्रकरण

शासनाचे ३ लाख ५३ हजार ५३४ रुपयांचे नुकसान झाले तरी जाधव यांच्याकडून काहीच कार्यवाही केली गेली नव्हती.
Gondia
Gondiasaam tv
Published On

- शुभम देशमुख

Gondia News : गोंदियाच्या सडक अर्जुनी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव यांना अवैध वृक्षतोड प्रकरणी चौकशीनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपवनसंरक्षक जयरामगौडा यांनी केली. (Maharashtra News)

Gondia
Rs 10, 000 Coin : दहा हजार रुपयांचे नाणे पाहण्यासाठी नगरवासियांची उडाली झुंबड

या कारवाईमुळे वन विभागात खळबळ उडाली आहे. सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रातील शेंडा क्षेत्रातील वन कक्ष क्रमांक ६७६ ( संरक्षित वन ) १७२ (राखीव वन ) ६८८, ७०३, ६८१ व ६७१ (संरक्षित वन) मध्ये टप्प्याटप्प्याने एकूण ४५ वृक्षाची अवैध वृक्षतोड करण्यात आली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या वृक्षांची किमत ४ लाख ८ हजार २०० रुपये आहे. तर यापैकी १६ नग म्हणजे ५४ हजार ६९१ रुपयांचे लाकूड वन परिक्षेत्र अधिकारी जाधव यांनी जप्त केले होते. पण या प्रकरणात वृक्षतोड करणाऱ्या अभय देत व एकूण वृक्षतोड केलेला पुर्ण लाकूडफाटा जप्त केला नाही.

परिणामी शासनाचे ३ लाख ५३ हजार ५३४ रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान याप्रकरणाची काही गावकऱ्यांनी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने वनविभागाने चौकशी केली. चौकशीत स्पष्ट झाल्याने उपवनसंरक्षक जयरामगौडा (forest department) यांनी सडक अर्जुनीचे वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Gondia
Shirdi Sai Baba Mandir : भाविकांनाे !शिर्डीतील साई मंदिर उद्या रात्रभर खुले राहणार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com