Wolf attacks in Uttar Pradesh's Bahraich Saam Tv
देश विदेश

Uttar Pradesh News: लांडग्यांना मारण्याचे सरकारने दिले आदेश, नेमकं काय आहे प्रकरण, का उचलण्यात आलं हे पाऊल? वाचा...

Wolf attacks in Uttar Pradesh's Bahraich: उत्तर प्रदेश सरकारने लांडग्यांना मारण्याचे आदेश जारी केले आहेत. येथील बहराइच येथे लांडग्यांनी मोठी दहशत निर्माण केली आहे.

Satish Kengar

उत्तर प्रदेश सरकारने लांडग्यांना मारण्याचे आदेश जारी केले आहेत. येथील बहराइच येथे लांडग्यांनी मोठी दहशत निर्माण केली आहे. येथे लांडग्याच्या हल्ल्यात आतापर्यंत 8 मुलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

यातच बऱ्याच प्रयत्नांनंतरही वनविभागाला फक्त चार लांडग्यांना पकडण्यात यश आलं आहे. अजूनही दोन लांडगे मोकाट असून लोकांवर हल्लेकर असल्याच्या घटना समोर येत आहेत. यातच या लांडग्यांना ठार मारलं पाहिजे, असं उत्तर प्रदेशचे वनविभागाच्या मंत्र्यांनी म्हटलं आहे.

याचबद्दल बोलताना उत्तर प्रदेशचे वनविभागाचे मंत्री अरुणकुमार सक्सेना म्हणाले की, ''लांडग्यांना पकडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी सातत्याने त्यांचा शोध सुरू आहे. बाकीचे लांडगे अजूनही पकडले जात नसतील तर त्यांना ठार मरावं लागेल. यातच लांडग्यांना मारणं चुकीचं ठरणार नाही. कारण आम्ही लांडग्यांना यापुढे लोकांवर हल्ला करू देऊ शकत नाही.'' पत्रकारांशी बोलताना ते असं म्हणाले आहेत.

यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारलं की, लांडग्यांना मारण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यावर ते म्हणाले की, ''लांडग्यांना मारण्याचे आदेश देणे चुकीचे नाही. दोन्ही लांडग्यांना पकडण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जावेत, असा आदेश आहे. जर त्यांना पकडता येत नसेल तर त्यांना मरावं, असं आदेशात म्हटलं आहे. यात काही गैर नाही.''

अरुणकुमार सक्सेना पुढे म्हणजे की, ''आम्हाला ड्रोनमध्ये सहा लांडगे दिसले आहेत. यापैकी चार पकडण्यात आले आहेत. अजून दोन लांडगे पकडायचे आहेत. खूप प्रयत्न करूनही आम्ही दोन लांडगे पकडू शकलो नाही. जर त्या दोन लांडग्यांना पकडू शकलो नाही, तर त्यांना मरावं लागेल पाहिजे. कारण आम्ही लांडग्यांवर असे हल्ले करू देऊ शकत नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

मोठी बातमी! NEET पेपरफुटीचं लातूर कनेक्शन उघड; सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात

मोदींच्या आवाहनानंतर VIP संस्कृतीला चाप, बचतीसाठी सरकारी कार्यक्रमांना कात्री

Maharashtra News Live Update: इंधन बचतीसाठी अकोला पोलीस अधीक्षकांचा अभिनव उपक्रम

महागाईचा बॉम्ब फुटणार? कोणत्या जीवनावश्यक वस्तू महागणार?

SCROLL FOR NEXT