Pankaja Munde : आमदार होताच पंकजा मुंडेंकडे मोठी जबाबदारी, थेट विधानसभेच्या तयारीलाच लागल्या!

Pankaja Munde News : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. जबाबदारी मिळताच पंकजा मुंडे यांनी कामाला सुरुवात केली आहे. आज मंगळवारी पंकजा मुंडे यांनी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेतली.
Pankaja Munde
Pankaja Munde NewsSaam tv
Published On

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषद सदस्य केलं. त्यानंतर आता त्यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे.

भाजप विधान परिषदेच्या सदस्या आमदार पंकजा मुंडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर मत मांडलं. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, 'भाजपच्या अनेक नेत्यांना वेगवेगळ्या विधानसभांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. हा संघटनेचा दौरा आहे. १०० ते १५० पदाधिकारी बैठकीला असतील आणि त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. विधानसभेची ही पूर्व तयारी आहे'.

Pankaja Munde
Pankaja Munde Meet Prakash Ambedkar: ओबीसींसाठी पंकजा मुंडे- प्रकाश आंबेडकर एकत्र? वाटेतच घडली आंबेडकर आणि मुंडे यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

तोडगा काढू - पंकजा मुंडे

चिंचवड विधानसभेत इच्छुक उमेदवारांविषयांवर पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं. 'प्रत्येकवेळी भाजप मार्ग काढतोच. आम्हाला इच्छुकांची यादीतून एकाचं नाव द्यावं लागतं. याची प्रॅक्टिस कोअर कमिटीला आहे. ते यातून तोडगा काढतील, असे त्या म्हणाल्या.

छत्रपती शिवरायांच्या पुतळा कोसळण्यावर मुंडे काय म्हणाल्या?

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यावर भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अतंत्य नम्रपणे माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील खरं प्रेम त्यातून व्यक्त केलं. काही घटना अशा घडतात, त्यावरून राजकारण करू नये. मात्र पंतप्रधान मोदी यांनी माफी मागून आदर्श दाखवून दिला. यातून विरोधकांनी प्रेरणा घ्यावी'.

Pankaja Munde
Video: ओबीसी आरक्षणासाठी पंकजा मुंडे- प्रकाश आंबेडकर एकत्र येणार? रणनिती काय?

राजकीय नेत्यांच्या आरोपावर बोलणार नाही - पंकजा मुंडे

देवेंद्र फडणवीसांनी सूरतविषयी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना मुंडे म्हणाल्या, ' या वक्तव्यानंतरचं छत्रपती शिवाजी महाराजांनी हे वक्तव्य केलं आहे. यानंतर कोणी काही वक्तव्य करण्याचं कारण नाही. कोणी काहीही बोललं, त्यावर मी बोलावं असं मला वाटत नाही. मग कोणत्याही राजकीय नेत्याच्या आरोपावर बोलणार नाही'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com