India New Zealand Free Trade Agreement  Saam TV
देश विदेश

दिवाळीआधी 'गुड न्यूज'! दारूपासून कीवी आणि सफरचंद होणार स्वस्त; एका कराराने भारताला मोठा दिलासा

India New Zealand Free Trade Agreement : भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार २० ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. यामुळे वाइन, कीवी, सफरचंद, अ‍ॅव्होकॅडो यांसारख्या वस्तूंवरील आयात शुल्क टप्प्याटप्प्याने कमी होणार आहे.

Namdeo Kumbhar

India-New Zealand FTA : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मुक्त व्यापार करार (FTA) येत्या २० ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. या करारामुळे न्यूझीलंडमधून भारतात येणाऱ्या वाइन, दारू (Wine), कीवी (Kiwi), सफरचंद आणि अ‍ॅव्होकॅडो यांसारख्या वस्तूंवरील आयात शुल्क कमी होणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी या गोष्टी स्वस्त होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, या करारामुळे भारतीय वस्तूंच्या निर्यातीलाही न्यूझीलंडच्या बाजारपेठेत मोफत प्रवेश मिळणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील बहुप्रतिक्षित मुक्त व्यापार करार (Free Trade Agreement - FTA) येत्या २० ऑक्टोबरपासून अधिकृतपणे लागू होणार आहे. या करारामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापाराला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय ग्राहकांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी ठरू शकते.

या ऐतिहासिक करारामुळे न्यूझीलंडमधून आयात होणाऱ्या प्रमुख प्रीमियम वस्तू स्वस्त होणार आहे. त्यामध्ये दारू, वाइन (Wine), कीवी, सफरचंद,चेरी, ब्‍लूबेरीज,सीफूड, एवोकॅडो आणि इतर दुग्धजन्य उत्पादनांचा समावेश आहे. या सर्व वस्तूंवरील कस्टम ड्युटी (आयात शुल्क) टप्प्याटप्प्याने कमी होणार आहे. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात भारतीय बाजारपेठेत या वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत.

दुसरीकडे, भारतालाही या कराराचा मोठा फायदा होणार आहे. भारतातील वस्त्रोद्योग (Textiles), औषधनिर्माण (Pharmaceuticals), अभियांत्रिकी वस्तू (Engineering Goods) आणि आयटी (IT) क्षेत्राला न्यूझीलंडच्या बाजारपेठेत विनाशुल्क किंवा अत्यंत कमी करात थेट प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे आयात-निर्यातीला मोठा चालना मिळून दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक मजबूत होणार आहेत.

भारतात आयात होणाऱ्या दारू वाईनवर सध्या जास्त शुल्क आकारले जाते. FTA नुसार पुढील १० वर्षांत न्यूझीलंडच्या वाईनवरील शुल्कात २५% किंवा ५०% पर्यंत कपात करण्याची तरतूद आहे. शुल्काचा दर वाईनच्या किमतीनुसार निश्चित केला जाईल. यामुळे किमती कमी होऊ शकतात. मात्र, ही सवलत एकाच वेळी लागू केली जाणार नाही, तर टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Lifestyle : मायक्रोवेव्ह की ओव्हन, जेवण कशामध्ये शिजवता? आरोग्यासाठी काय योग्य? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: अर्धा तासाचा पावसामध्ये भिवंडी शहरात अनेक ठिकाणी साचले पाणी

CSK head coach : धोनीच्या चेन्नईचा हेड कोच बदलला, महाराष्ट्रातील स्टारकडे जबाबदारी

Walk According to Age: २० ते ६० वयानुसार रोज किती चालावं? जाणून घ्या आरोग्यासाठी योग्य चालण्याचं प्रमाण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन; पोलिस दलात हळहळ

SCROLL FOR NEXT