Arvind Kejriwal On Congress ANI
देश विदेश

Arvind Kejriwal: लोकसभा निवडणुकीनंतर आप-काँग्रेस युती तुटणार? अरविंद केजरीवाल यांनी केलं सूचक वक्तव्य

AAP-Congress Alliance News: अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या युतीबद्दल सूचक वक्तव्य केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

इंडिया आघाडीचा भाग असलेले आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आघाडीच्या भवितव्याबाबत मोठे वक्तव्य केलं आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले की, आपची काँग्रेससोबतची युती कायमस्वरूपी नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दावा केला की, 4 जून रोजी धक्कादायक निकाल येतील. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी जिंकेल. दिल्लीत आप आणि काँग्रेसमध्ये युती आहे, तर शेजारच्या पंजाब राज्यात दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.

काँग्रेस आणि आप युतीबद्दल बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही लग्न केलेलं नाही. आमचं अरेंज मॅरेज किंवा लव्ह मॅरेज झालेलं नाही. देश वाचवण्यासाठी 4 जूनपर्यंत निवडणूक लढण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. भाजपचा पराभव करणे आणि सध्याच्या राजवटीची हुकूमशाही आणि गुंडगिरी संपवणे हे आमचे सध्याचे उद्दिष्ट आहे.

ते म्हणाले, देश वाचवणे महत्त्वाचे आहे. जिथे जिथे भाजपचा पराभव करण्यासाठी युतीची गरज होती, तिथे आप आणि काँग्रेसने एकत्र येऊन उमेदवार उभे केले. पंजाबमध्ये भाजपचे अस्तित्व नाही.

अटकेनंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याच्या प्रश्नावर केजरीवाल म्हणाले की, मी घाबरत नाही आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पुन्हा तुरुंगात जाणे हा माझ्यासाठी मुद्दा नाही. या देशाचे भवितव्य धोक्यात आहे. ते मला हवे तोपर्यंत तुरुंगात ठेऊ शकतात. भाजपला हेच हवे आहे, त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

SCROLL FOR NEXT