will compulsion of wearing mask in maharashtra? Saam TV
देश विदेश

राज्यात पुन्हा मास्कची सक्ती? पीएम घेणार देशातील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

Compulsion of Wearing Mask: आज (बुधवार) दुपारी दुपारी बारा वाजता पंतप्रधान मोदी हे देशातील मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक (व्हीसी) घेणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई: कोरोना महामारीची आटोक्यात आली असली तरी गेल्या काही दिवसांपासून देशातील काही राज्यामध्ये कोरोना (Covid 19) रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईतही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशात महाराष्ट्रात पुन्हा मास्क (Mask) घालण्याची सक्ती शकते. देशाच्या इतर राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता काल (२६ एप्रिल) महाराष्ट्र कोविड टास्क (Maharashtra Covid Task Force) फोर्सची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बंदिस्त ठिकाणी मास्क घालणे सक्तीचे करावे अशी भूमिका टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना समोर मांडली आहे. (will compulsion on wearing a mask in Maharashtra? pm modi will take meeting with chief ministers today)

हे देखील पाहा -

बंदिस्त ठिकाणी मास्क घालणे सक्तीचे करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. आज (बुधवार) दुपारी दुपारी बारा वाजता पंतप्रधान मोदी (PM Modi) हे देशातील मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक (व्हीसी) घेणार आहेत. या बैठकीत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. इतर राज्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा महाराष्ट्र सतर्क झाला आहे.

मुंबईतील कालची (२६ एप्रिल) रुग्णसंख्या

मंगळवारी नव्या १०२ कोरोना रुग्णांची मुंबईत नोंद झाली. २७ फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच मुंबईत (Mumbai) कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णसंख्येची नोदं झालीय. मंगळवारी २४ तासात बरे झालेले रुग्ण ८५ होते. तर बरे झालेले आतापर्यंतचे एकूण रुग्ण १०,३९,३२२ आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८% होता तर एकूण सक्रिय रुग्ण ५४९ आहेत. त्याचप्रमाणे रुग्ण दुप्पटीचा दर ९५१५ दिवस इतका आहे.

महाराष्ट्रातील कालची (२६ एप्रिल) रुग्णसंख्या

मंगळवारी राज्यात 153 रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 943 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 135 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज चार कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,28, 297 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 8,00,82, 006 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

देशातील कालची (२६ एप्रिल) रुग्णसंख्या

गेल्या 24 तासात देशात 2 हजार 380 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 56 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, देशात आत्तापर्यंत 4 कोटी 30 लाख 49 हजार 974 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामुळे 5 लाख 22 हजार 062 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ६३६ आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US Presidential Election Result: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल, आतापर्यंत १९८ मतं; कमला हॅरीस यांना किती मतं?

Maharashtra Politics: नवाब मलिक रिंगणात, महायुतीत वाद; भाजप प्रचार करणार नाही, आशिष शेलारांचं वक्तव्य

Sanam Kapoor Story: गडगंज पगाराच्या नोकरीला रामराम, १२० स्क्वेअरफूटमध्ये सुरुवात, आता हजारो कोटींचा मालक, सक्सेस स्टोरी वाचाच

Sharad Pawar News: शरद पवारांचे अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य; काकांकडून पुतण्याच्या कौतुकाचं गूढ काय?

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत भाजपकडून ४० जणांची हकालपट्टी, बंडखोरांना दाखवला घरचा रस्ता!

SCROLL FOR NEXT