बायकोचा बर्थ डे विसरणे नवऱ्याला पडले महागात...  Saam Tv
देश विदेश

बायकोचा बर्थ डे विसरणे नवऱ्याला पडले महागात...

बायकोचा बर्थ डे विसरणे म्हणजे नवऱ्याचे सर्वात मोठे संकट असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : बायकोचा बर्थ डे Wifes birthday विसरणे forget म्हणजे नवऱ्याचे सर्वात मोठे संकट असते. त्यानंतर त्याचे काही त्याला परिणाम देखील भोगावे लागतात. हे आपल्याला चांगलेच माहिती आहे. बायको रागावते, चिडते, भांडणं करते, तर काही दिवस ती अबोला देखील राहते. तर फार- फार तर जेवण देत नाही. पण या प्रकरणात तर बायकोने चांगलीच हद्दच पार केली आहे.

तिने यापुढे जाऊन देखील थेट नवऱ्यासोबत नातं तोडण्याचाच मोठा निर्णय घेतला आहे. आग्र्यात राहणारे हे दाम्पत्य उच्चशिक्षित आहे. महिला पीएचडी करत आहे. तर तिचा नवरा कॉलेजमध्ये अकाऊंटट आहे. ३ वर्षांअगोदर त्यांचे लग्न झाले आहे. लग्नानंतर marriage काही दिवसांनी त्यांच्यामध्ये छोटे- मोठे वाद Argument होतं असत.

हे देखील पहा-

पण बायकोच्या वाढदिवसा दिवशी वाद इतका विकोपाला गेला की. नवऱ्याने आपल्याला बर्थ - डे विश देखील केले नाही, म्हणून बायको नाराज झाली. यानंतर तिने त्याच्याबरोबर राहण्यासच चक्क नकार दिला आहे. नवऱ्याने हात जोडून तिची माफी मागितली. नातं तोडू नको म्हणून त्यांनी खूप विनवणी देखील केली होती.तिला मनवण्याचा प्रयत्न देखील खूप केला होता. पण बायकोने त्याचे काहीच ऐकले नाही. ती आपल्या निर्णयावर ठाम राहिलेली होती. मिळालेल्या माहितीनुसार अखेर कौटुंबिक सल्ला केंद्रापर्यंत हे प्रकरण शेवटी पोहोचलेच.

त्याठिकाणी नवऱ्याच्या विरोधामध्ये तिने तक्रार केली आहे. महिलेने ३ वर्षांमधील सर्व तक्रारींचा पाढाच तिने त्यांच्या समोर वाचून काढला आहे. नवरा कोणते काम आईवडिलांना विचारल्या शिवाय करत नव्हता. यावरून त्यांच्यामध्ये सारखेच वाद होत होते. याच भांडणाला वैतागलेला नवरा बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरला आणि त्याची इतकी मोठी शिक्षा त्याला मिळाली आहे. या दाम्पत्याचे समुपदेशन करण्यात आले आहे. अद्यापही हे वाद आजून देखील मिटलेला नाही. त्यांना आता या प्रकरणासाठी पुढील तारीख देण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde News : शिंदेंच्या शिवसेनेला एकाच दिवसात ३ धक्के, KDMC मधील दिग्गज नेत्यांनी केला भाजपात प्रवेश

Maharashtra Live News Update: अंजनेरी पर्वतावर हनुमानाचे भव्य मंदिर बनवा, हनुमान जन्मस्थान संस्थेची मागणी

Ladki Bahin Yojana: निवडणुकीआधी लाडक्या बहि‍णींना खुशखबर मिळणार, नोव्हेंबरचे ₹१५०० या दिवशी जमा होण्याची शक्यता

Shocking: ड्रग्ज देऊन चौघांकडून सामूहिक बलात्कार, तक्रार द्यायला गेल्यावर पोलिसांनीही अब्रु लुटली अन् ₹५००००..., थरकाप उडवणारी घटना

बॉलिवूडमध्ये खळबळ! प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याविरूद्ध कोट्यवधींच्या फसवणुकीचा गुन्हा, म्हणाले, 'पोलिसांना दिशाभूल केली...'

SCROLL FOR NEXT