Chhattisgarh Crime News  Saam Tv
देश विदेश

Shocking News : 'मी तुझ्या वडिलांचा खून ..' नवऱ्याची हत्या करून बॅगेत भरलं; बायकोनं थेट मुंबई गाठली अन्..

Chhattisgarh Crime News : छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातील भिंजपूर गावात धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने हातोड्याने पतीची हत्या करून मृतदेह सूटकेसमध्ये लपवला. मुलीला फोन करून स्वतः कबुली दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली.

Alisha Khedekar

छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात पत्नीने हातोड्याने पतीची हत्या केली

मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून सूटकेसमध्ये लपवला

महिलेने स्वतःच्या मुलीला फोन करून कबुली दिल्यानंतर गुन्हा उघड

पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून तपास सुरू केला आहे

छत्तीसगडमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने स्वतःच्या पतीची हत्या करून मृतदेह बॅगेत लपवल्याची घटना घडली आहे. धक्कदायक म्हणजे या महिलेने स्वतःच्या मुलीला फोन करून सांगितले की, मी तुझ्या वडिलांचा खून केला आहे आणि मृतदेह घरी सूटकेसमध्ये आहे. या घटनेप्रकरणी महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरु केला आहे. या हत्येनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातील दुलदुला पोलीस स्टेशन परिसरासरातील भिंजपूर गावात घडली आहे. गावातील रहिवासी असलेल्या संतोष भगत आणि त्याची पत्नी मंगरुता भगत या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. काही दिवसांपूर्वी मंगरुता मुंबईहून गावी परतली. त्यांनतर भगत जोडप्यामध्ये मोठा वाद झाला. या वादातून संतापलेल्या मंगरुताने तिच्या पतीला लोखंडी हातोड्याने मारहाण केली.

हत्येनंतर तिने मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. मंगरुताने संतोषचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळला, लाल ट्रॉली बॅगमध्ये भरला आणि घरात लपवला. त्यानंतर तिने तिच्या मधल्या मुलीला फोन करून सर्व काही सांगितले. "मी तुझ्या वडिलांचा खून केला आहे आणि मृतदेह घरी सूटकेसमध्ये आहे,". आईचे बोलणे ऐकून मुलगी घाबरली. ती ताबडतोब तिच्या पतीसोबत गावात परतली आणि तिच्या काकांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या काकांनी ताबडतोब दुलदुला पोलिसांना कळवले.

पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घराची झडती घेतली. झडतीदरम्यान त्यांना एक ट्रॉली बॅग सापडली, जी उघडताच संतोष भगतचा मृतदेह आढळून आला. मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला होता आणि चेहऱ्यावर आणि हातावर रक्ताचे डाग होते. कुटुंबीयांनी सांगितले की मंगरुता मुंबईत काम करत होती आणि काही दिवसांपूर्वी गावी परतली होती. हत्येनंतर ती पुन्हा मुंबईला पळून गेली. घटनेची माहिती मिळताच एसएसपी शशी मोहन सिंह देखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की मृताच्या भावाच्या तक्रारीवरून दुलदुला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे -बंगळुरू महामार्गावर भयंकर अपघात, कंटेनरची एकमेकांना धडक

Yami Gautam: कॉन्ट्रास्ट फॅशनचा नवा ट्रेंड, कश्मिरी ब्यूटी यामी गौतमचा पिंक ड्रेस लूक व्हायरल, पाहा PHOTO

Mahalaxmi Rajyog 2025: भूमिपुत्र मंगळ बनवणार पॉवरफुल योग; 'या' ३ राशींच्या व्यक्तींवर पडणार नोटांचा पाऊस

ED चं खोटं पत्र, अर्थमंत्र्यांच्या नावानं वॉरंट; पुण्यातल्या महिलेची ९९ लाखांची फसवणूक

Sonalee Kulkarni: मराठमोळ्या अभिनेत्रीचा हॉट लूक, समुद्रावर काळ्या बिकिनीत केलं फोटोशूट

SCROLL FOR NEXT