Viral News  Saam Tv
देश विदेश

Viral News: मृत पतीचे शेवटचे दर्शन घ्यायला गेली, पत्नीचा स्पर्श होताच घडला चमत्कार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral News: मृत पावलेला माणूस जिवंत होतो ही घटना क्वचितच घडते. अशीच घटना अमेरिकेत घडली आहे. डॉक्टरांनी एका व्यक्तीला मृत म्हणून घोषित केले आणि त्याचे पार्थिव अवयवदानासाठी नेण्याची तयारी ही सुरु केली. त्या ठिकाणी पतीच्या अंत्यदर्शनासाठी पत्नीने स्पर्श करताच पतीच्या हृदयाचे ठोके सुरु झाले. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, रुग्ण कोमात गेला होता, त्याचा मृत्यू झाला नव्हता. अजूनही रुग्णाची परिस्थिती चिंताजनकच आहे. त्या रुग्णाचे नाव रयान मार्लो असून अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे तो राहत होता.

रयान मार्लोला गेल्या महिन्यात आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले होते. त्याला लिस्टेरिया (Listeria) आजाराची बाधा झाली होती. त्या आजाराने त्याच्या मेंदूला सुज येऊन तो कोमामध्ये गेला होता. २७ ऑगस्टला डॉक्टरांनी मेंदू मृत (Brain Death) झाल्याचे सांगितले होते. नॉर्थ कॅरोलिनामधील कायद्यानुसार मेंदूने काम बंद केलेल्या रुग्णांना मृत घोषित करण्यात येते. त्यामुळे डॉक्टरांनी रियान यांना मृत घोषित केले.

रियानच्या पत्नी मेघन यांनी सांगितले की, डॉक्टर बाहेर येताच मला म्हणाले की, तुमच्या पतीचे निधन झाले आहे. मृत्यूच्या दाखल्यावर न्यूरोलॉजिकल डेथ असे लिहून वेळ मृत्यूची वेळ टाकण्यात आली. आपल्या पतीने अवयवदान केल्याची माहिती डॉक्टरांनी आपल्याला दिली. तसेच त्यांच्या अवयवदानाची तयारीही करण्यात आली. पतीचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मी गेले असता त्यावेळी आपण त्याला स्पर्श केला आणि आपल्याला त्याच्याशी जे काही बोलायचे होते, ते मनमोकळेपणाने बोलले. त्यानंतर अचानक चमत्कार व्हावा, तसेच घडले आणि त्याची हृदयक्रिया सुरू झाली आणि त्याने हातापायांची हालचाल केली.

आपण डॉक्टरांना बोलावले आणि त्यांनी तातडीने रियानला अतिदक्षा विभागात दाखल करत उपचाराला सुरुवात केली. तपासणीत रियान ब्रेन डेड झाला नसून त्याच्या मेंदूला रक्त पुरवठा सुरू आहे. मात्र, तो कोमामध्ये आहे. तुम्ही त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलतात, ते त्याच्यापर्यंत पोहचले. त्यावर त्याला प्रतिक्रिया द्यायची इच्छा झाल्याने त्याची हृयक्रिया पुन्हा सुरू झाली आणि त्याने शरीराची हालचाल केली, असे डॉक्टरांनी सांगितले. सध्या त्याची प्रकृती गंभीर असून तो अजूनही कोमामध्ये आहे. आपण बोललेले त्याला समजते. मात्र, तो प्रतिक्रिया देऊ शकत नाही. मात्र, तो लवकरच बरा होईल, असा विश्वास आपल्याला आहे. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतरही त्याची हृदयक्रिया पुन्हा सुरू झाली आणि त्याने शरीराची हालचाल केली, हा चमत्कार आपण स्वतः पाहिला आहे. त्यामुळे तो लवकर बरा होईल, असा विश्वास मेघन यांनी व्यक्त केला आहे.

Edited By: Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT