Voter ID Scam in South Mumbai: मुंबईच्या सोसायटीमध्येही व्होटचोरी? राहणार फुटपाथवर, पत्ता सोसायटीचा

Mumbai’s Voter ID Controversy:आता मुंबईतील सोसायटीमध्ये राहणाऱ्यांना सावध करणारी बातमी आहे. स्थानिक रहिवाशांच्या कागदपत्रांचा वापर करुन चक्क फुटपाथवर राहणाऱ्यांनी मतदार ओळखपत्र मिळवलंय. कशा पद्धतीने आणि कुठं उघडकीस आलाय हा गंभीर प्रकार ?
Residents of Kalbadevi’s Gold Mohur Society express shock over footpath dwellers using their address to obtain voter ID
Residents of Kalbadevi’s Gold Mohur Society express shock over footpath dwellers using their address to obtain voter IDSaam TV
Published On

मुंबईत घर नाही, आधार कार्ड नाही, लाईट बील नाही तरीही मुंबईतलं व्होटर कार्ड मात्र आहे.

तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. पण हे वास्तव आहे.

दक्षिण मुंबईसारख्या सधन भागातला हा प्रकार आहे. धक्कादायक बाब म्हणजे चक्क फुटपाथवर राहणाऱ्यांकडे मतदार ओळखपत्र असून त्यावरचा पत्ता मात्र परिसरातल्या सोसायटींचा आहे. फुटपाथवर राहणाऱ्या परप्रांतीयांनी गृहनिर्माण सोसायटीच्या पत्त्याचा वापर करून मतदार ओळखपत्र, आधार, पॅन कार्ड, मनपाचे गुमास्त अनुज्ञापत्र तसेच गॅस आणि वीज जोडणी सारखी महत्वाची कागदपत्रं मिळवली आहेत. काळबादेवी भागातील गोल्ड मोहर सोसायटीचे रहिवाशी काय सांगतात पाहा

ही कागदपत्रे तयार करण्यासाठी पहिल्यांदा मिळवलं गेल ते सोसायटीचं मेन्टेनन्स बिल. त्या पत्त्यावर आपली ओळख सिद्ध केल्यानंतर वीज बिल मिळवलं गेलं. त्याच्या आधारे

आधार कार्ड आणि आधार कार्डवरून पॅन कार्ड, बँक खाते

त्यानंतर रहिवासी दाखला आणि शेवटी मतदार ओळखपत्र मिळवलं.

कुलाबा मतदारसंघातील दक्षिण मुंबईतल्या पोपटवाडीतील पदपथावर मोठ्या संख्येने परप्रांतीय आहेत. या भागातील गोल्ड मोहर हाऊसिंग सोसायटी आणि आसपासच्या इमारतींच्या पत्त्याचा वापर करून परप्रांतीयांनी

व्होटर कार्ड तयार केलंय.'आम्ही गिरगावकर' संघटनेने हा गंभीर प्रकार उघडकीस आणला. संघटनेने एल. टी. मार्ग पोलीस ठाणे, मनपाचे 'सी' विभाग कार्यालय, जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. मात्र सरकारी यंत्रणांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचं संघटनेचे म्हणणे आहे.

सध्या देशभरात व्होट चोरीच्या आरोपांवरून राळ उडालेली आहे. राहुल गांधींनी थेट पुरावे दाखवून निवडणूक आयोगाला घेरलं आहे. महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीनंतर मतदार संख्या 40 लाखांनी वाढली आहे. या पार्श्वभूमिवर दक्षिण मुंबईतला व्होट चोरीचा प्रकार यंत्रणांच्या बेजबाबदार कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. यावर साम टीव्हीने सवाल उपस्थित केले आहेत.

फुटपाथवर राहणाऱ्यांच्या हाती सोसायटीची कागदपत्रं कशी गेली?

फुटपाथवर राहणाऱ्या परप्रांतीयांकडील कागदपत्रांची फेरतपासणी का केली गेली नाही?

फेक व्होटर कार्ड तयार करण्यात स्थानिक लोकांचा हात आहे का?

मनपा, पोलिस, निवडणूक आयोगाने संघटनेच्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे व्होटर कार्डचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. मग प्रशासकीय यंत्रणा काय करत होती..? मुंबईला आधीच परप्रांतीयांचा विळखा पडलाय त्यातच मतदारयादीत घुसखोरी करुन इथे कायमच बस्तान मांडण्याचा प्रयत्न हाणून पाडणं गरजेचे आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या बोगस मतदारांना वेळीच शोधून काढून त्यांच्यावर आणि त्यांना मदत करणाऱ्यावर कठोर कारवाई करायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com