एकीकडे अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याने टाहो फोडलाय.. त्यामुळे या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी भरघोस मदतीशिवाय कर्जमाफी करण्याची मागणी जोर धरतेय.. त्यातच उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना मदतीसाठी थेट पंतप्रधान मोदींच्या जिव्हाळ्याच्या PM केअर्स फंडातून कर्जमाफीची मागणी केलीय...
त्याच दरम्यान महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट दिल्ली गाठत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणी केलीय.. दुसरीकडे ठाकरेंनी PM केअर्स फंडाबाबत केलेलं वक्तव्य भाजपच्या चांगलंच जिव्हारी लागलंय.. त्यामुळे भाजपनंही थेट कोरोना काळात ठाकरेंनी CM केअर फंडातून रुपयाही खर्च केला नसल्याचा पलटवार केलाय..
खरंतर राज्यभरात 147 लाख हेक्टरवर पेरणी झाली... आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळे मराठवाडा, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव सोलापूरसह 30 जिल्ह्यातील जवळपास ९२ लाख हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याने विदारक परिस्थिती निर्माण झालीय... शेतकऱ्याच्या स्वप्नांचा चिखल झालाय.. मात्र सरकारने 2215 कोटींचं पॅकेज जाहीर करत प्रति हेक्टरी 8500 रुपयांवर बोळवण केलीय.. सगळंच उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी आत्महत्यांकडे वळायला लागलाय.. त्यामुळे खचलेल्या आणि कोलमडून पडलेल्या बळीराजाला वाचवण्यासाठी सरकारने अटी, निकषांच्या पुढे जाऊन आधार देण्याची गरज आहे...त्यामुळे केंद्र सरकार 50 हजार कोटींची मदत देऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार की PM केअर्सवरुन ठाकरे आणि फडणवीसांमधला वाद आणखी टोकाला जाणार...याकडे राज्याचं लक्ष लागलंय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.