Wife Killed Husband in Bihar  Saam tv
देश विदेश

Wife Killed Husband : लग्नाच्या ३ वर्षांनंतर संसारात ठिणगी पडली; बायकोने नवऱ्याला टरबुजातून विष देऊन संपवलं, वटसावित्रीआधीच जीवघेणा खेळ

Wife Killed Husband in Bihar : संसारात ठिणगी पडल्यानंतर बायकोने नवऱ्याला संपवल्याची घटना घडली. बायकोने टरबुजातून विष देऊन नवऱ्याला संपवलं आहे.

Vishal Gangurde

Wife killed husband : बायकोने नवऱ्याला संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वादानंतर बायकोने टरबुजातून विष देऊन नवऱ्याला संपवल्याची घटना घडली आहे. बिहारच्या गया जिल्ह्यातील केशापी गावात ही घटना घडली. २२ वर्षीय बायकोने तिच्या २५ वर्षीय नवऱ्याला संपवलं आहे. २२ वर्षीय या महिलेने वटसावित्रीआधी केलेल्या या कृत्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

बिहारच्या केशापी गावातील २२ वर्षीय लखिया देवीने तिचा पती मंटू यादवला टरबुजातून विष दिलं. विष प्यायल्यानंतर मंटूची तब्येत बिघडली. त्यानंतर रुग्णालयात नेताना मंटू यादवचा मृत्यू झाला. मंटू यादव आणि लखियाचं २०२२ साली झारखंडच्या बेला गावात लखियासोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर पत्नी अधिक वेळ माहेरीच राहायची. एका महिन्यापूर्वीच पत्नी सासरी आली होती.

दोन दिवसांपूर्वी मंटू आणि लखियामध्ये वाद झाला होता. वादाच्या रात्री मंटू कामानिमित्त घराबाहेर गेला. सोमवारी लखियाने नवऱ्याला फोन करून घरी बोलवलं. घरी आल्यानंतर त्यांच्या खोलीत गेले. त्यानंतर आतून दरवाजा बंद केला. काही तासानंतर मंटूचा ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर मंटूचे नातेवाईक धावून आले. त्यावेळी मंटूने सांगितलं की, 'मला बरं वाटत नाहीए. मला बायकोने टरबुजातून काही तरी मिसळून खायला दिलं होतं'.

लखियाच्या या कृत्यानंतर तिच्या माहेरी ही बाब सांगितली. त्यानंतर मंटूच्या सासरा, सासू आणि मेव्हणा धावत आले. त्यांनी मंटूला रिक्षातून रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी मंटूला मृत घोषित केले. पोलिसांनी मंटूचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच पोलिसांनी पत्नी लखिया, सासू आणि सासऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी सांगितलं की,'मंटूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मगध मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मंटूचा मृत्यू कसा झाला, याची माहिती मिळेल. सध्या पोलिसांकडून ताब्यात असलेल्या पत्नीची चौकशी सुरु आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज ठाकरे उद्या सोलापूर दौऱ्यावर, पूरपरिस्थितीची पाहणी करणार

Navapur Police : भाजीपाला वाहतुकीच्या नावाखाली दारू तस्करी; नवापूर पोलिसांच्या कारवाईत ५ लाखांची दारू जप्त

OTT Releases: विकेंड होणार धमाकेदार, एक-दोन नाही तर तब्बल १३ वेब सिरीज आणि चित्रपट होणार प्रदर्शित

Bullet Train: गुड न्यूज! बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार? प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होणार

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

SCROLL FOR NEXT