Marriage viral video saam tv
देश विदेश

Viral Video : नव्या नवरीनं स्टेजवरच असं काय केलं? नवरदेव बिच्चारा...

आपल्या घरातलं लग्न सगळ्यांच्या लक्षात राहावं यासाठी काय काय करतात....

साम टिव्ही ब्युरो

Bride Viral Video : लग्न म्हटलं की वेगवेगळ्या विधी, कार्यक्रम आलेच. मनोरंजनाचा तडकाही असतो. आपल्या घरातलं लग्न सगळ्यांच्या लक्षात राहावं यासाठी काय काय करतात. भरपूर पैसा खर्च करतात. लग्नाला (Marriage) मित्रमंडळी आणि कुटुंबीय खूपच धम्माल करतात.

खासकरून मित्र आणि भावा-बहिणींचा डान्स. डान्स कसा धम्माल होईल, सगळे आपलीच चर्चा करतील, यासाठी ते पुरेपूर प्रयत्न करतात. याशिवाय या लग्नात नातेवाइक नवरदेव-नवरीला हटके गिफ्टही देतात. या लग्नाच्या कार्यक्रमात नवरा-नवरी खास बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स करतात. आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांसाठी हे मोठं सरप्राइज असतं. (Viral News)

काही कपल तर आपल्याच लग्नात इतकी धम्माल, मस्ती आणि नाचतात की त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होतात. नेटकऱ्यांकडून त्यांचं भरभरून कौतुकही केलं जातं. असाच एक लग्नाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.

अनामिका नावाच्या ट्विटर यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. नवविवाहित जोडपं स्टेजवर डान्स करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. नवरी मुलगी भन्नाट डान्स करत असून, नवरदेव तिच्या डान्ससमोर हतबल झालेला दिसतोय. जवळपास सव्वादोन मिनिटांच्या या व्हिडिओत दोघेच नाचताना दिसत आहेत. तर स्टेजजवळ उपस्थित असलेला पाहुणे एन्जॉय करताना दिसत आहेत.

काही पाहुण्यांनी स्टेजवर जाऊन नवरा-नवरीचं कौतुक केलं आणि भेट म्हणून पैसे दिले. विशेष म्हणजे नवरीमुलगी प्रोफेशनल डान्सर असल्यासारखं नाचत आहे. तर नवरा मुलगा बिच्चारा थोडा लाजताना दिसत आहे. डान्स करताना तो मधेमधे थोडा थांबत होता. पण नवरी मुलगी नॉनस्टॉप नाचत होती. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आहेत. तर शेकडो कमेंटही आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dengue Fever : डेंग्यूचा सर्वाधिक धोका कोणाला? रुग्णसंख्या वाढण्यामागची कारणे

NCP Corporator Disqualified: शरद पवार गटाला मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचं पद रद्द; काय आहे कारण?

Manoj Jarange-Eknath Shinde: ५०० कोटींच्या आरोपावर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले, मनोज जरांगेंना सल्लाही दिला

Clove Water Benefits: लवंगाचे पाणी प्यायल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या हे ७ आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Update: आता फक्त २३ ऑक्टोबर रोजी मतदान संपेपर्यंत "ड्राय डे" घोषित

SCROLL FOR NEXT