मोबाईल फोनसाठी कायपण! फोन विकत घेण्यासाठी तरुणी स्वत:चे रक्त विकायला थेट रुग्णालयात

मोबाईल स्मार्टफोन दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक तर बनलाच आहे, पण...
Blood selling for mobile smart phone
Blood selling for mobile smart phonesaam tv
Published On

मुंबई : मोबाईल स्मार्टफोन दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक तर बनलाच आहे, पण फोन हातात घेतल्याशिवाय माणसांची सकाळ होत नाही, असंही बोललं जातं. ते खरंच आहे. कारण स्मार्टफोन (Mobile Smart Phone) विकत घेण्यासाठी हल्लीची तरुणपीढी काय अजब कारनामा करतील, याचा काही नेम नाही. पश्चिम बंगालमध्येही असाच काहिसा प्रकार घडला आहे. एका १६ वर्षीय तरुणीने स्मार्टफोन विकत घेण्यासाठी चक्क स्वत:चे रक्त विकण्यासाठी थेट जिल्हा रुग्णालय गाठले. (Minor girl selling blood to buy mobile smart phone)

Blood selling for mobile smart phone
T20 World Cup : आता तर हद्दच झाली, नेट प्रॅक्टिस करताना विराट कोहली चाहत्यांवर भडकला, पाहा Video

तरुणी स्मार्टफोन (Mobile) घेण्यासाठी रक्त विकत आहे, अशी माहिती रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी चाईल्डलाइनला याबाबत महिती दिली. त्यानंतर या तरुणीचं समुपदेशन करण्यात आलं. जिल्हा बाल कल्याण समितीमार्फत या तरुणीला पालंकाकडे सोपवण्यात आलं. ही तरुणी जेव्हा रुग्णालयात आली, तेव्हा ती रक्तदान करण्यासाठी आली असेल,असं सर्वांना वाटलं. पण तिने रक्त विकायचे आहे, असं जेव्हा सांगितलं तेव्हा सर्वांना धक्का बसला.

Blood selling for mobile smart phone
Maharashtra Politics : भास्कर जाधव हे ठाकरेंची आयटम गर्ल; भाजप आमदाराची जीभ घसरली

जवळच्या नातेवाईकाच्या फोनवरून ऑनलाईन फोन बुक केला आहे. त्यामुळे मोबाईल विकत घेण्यासाठी मला पैशांची गरज आहे. म्हणून मी स्वत:चे रक्त विकण्यासाठी रुग्णालयात आली होती. मी 9 हजार रूपयांचा मोबाईल फोन ऑर्डर केला आहे, या फोनची डिलिव्हरी गुरुवारी होणार आहे, असं त्या तरुणीनं सांगितलं.

ट्युशनला जात असल्याचे सांगून तरूणी घरातून निघून गेली होती. बसस्थानकावर सायकल ठेवून ती बसने थेट बालूरघाट जिल्हा रुग्णालयात पोहोचली. तपन नावाच्या ठिकाणाहून ही तरूणी बालूरघाटात पोहोचली असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com