Atal Bihari Vajpayee speech Saam Tv
देश विदेश

Israel-Hamas War:इस्राइल-हमासच्या युद्धादरम्यान का होते अटल बिहारी वाजपेयींची चर्चा? काय आहे कारण?

Israel-Hamas War: भारताने इस्राइलला पाठिंबा दिला म्हणून इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी पंतप्रधान मोदींनीचे आभार मानले आहेत.

Bharat Jadhav

Atal Bihari Vajpayee speech :

इस्राइल- हमासच्या दरम्यान युद्ध पेटलं आहे. या युद्धात १६०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. दरम्यान इस्राइल- हमासच्या युद्धामुळे भारतातील राजकारण तापले आहे. दरम्यान अनेक देशांनी इस्राइलला पाठिंबा दिलाय. अमेरिकेसह, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि ब्रिटनसह भारतानेही इस्राइलला पाठिंबा दिलाय. भारताने इस्राइलला पाठिंबा दिला म्हणून इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी पंतप्रधान मोदींनीचे आभार मानले आहे. (Latest News)

यामुळेच भारतातील राजकीय चर्चेला उधाण आले आहे. इस्राइलला पाठिंबा दिल्यानंतर एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपला या मुद्द्यावर देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या विधानाची आठवण करून दिली. अटल बिहारी वाजपेयी यांचा हा व्हिडिओ ४६ वर्ष जुना आहे. प्रसार भारती या वाहिनीचा हा व्हिडिओ आहे. यात वाजपेयी इस्राइलविषयी विधान करत आहेत.

१९७७ मध्ये जनता पक्षाच्या विजयी रॅलीत वाजपेयींनी पॅलेस्टाईनला उघडपणे पाठिंबा दिला होता. 'इस्राइलला अरबांची जमीन ताब्यात घेतली आहे. इस्राइलला ही जमीन खाली करावी लागेल. आता जनता पक्षाचं सरकार आलं आहे. हे सरकार आता इस्राइलला पाठिंबा देणार नाही. आम्ही प्रत्येक प्रश्नाला गुण आणि अवगुणच्या व्याख्येतून पाहू. परंतु मध्यपूर्वेतील स्थितीविषयी आमचं मत स्पष्ट आहे. इस्राइलने ज्या अरब भूभागावर कब्जा केलाय, ती रिकामी करावी लागेल.

जे पॅलेस्टिनी आहेत त्यांचे योग्य हक्क प्रस्तावित केले पाहिजेत. इस्राइलचे अस्तित्व सोव्हिएत रशिया आणि अमेरिकेनेही मान्य केले असून आम्हीही स्वीकारले आहे'. असं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते. अटलबिहारी वाजपेयी यांनी कायमस्वरूपी शांततेबद्दल बोलताना म्हटले होते, "मध्यपूर्वेतील असा उपाय शोधावा लागेल जो आक्रमकता दूर करेल आणि कायमस्वरूपी शांततेचा आधार बनेल. असेही वाजपेयी म्हटले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT