RBI Governor Reaction on 2000 Rupees Notes Saam Tv
देश विदेश

2000 Rupees Notes: 2000 ची नोट बंद का केली? स्वतः RBI गव्हर्नर यांनीच केला मोठा खुलासा, नागरिकांना म्हणाले...

2000 ची नोट बंद का केली? स्वतः RBI गव्हर्नर यांनीच केला मोठा खुलासा, नागरिकांना म्हणाले...

Satish Kengar

RBI Governor Reaction on 2000 Rupees Notes: अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) २००० रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० रुपयांच्या नोटा बँकेत जमा करता येतील आणि बदलून घेता येतील, अशी माहितीही आरबीआयने दिली आहे.

मात्र अजूनही नागरिकांच्या मनात यासंबंधित बरेच प्रश्न आहेत. यातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Rbi Governor Shashikant Das) यांनी २००० ची नोट का बंद केली, याबाबत खुलासा केला आहे.

'नोटा बदलण्यासाठी घाई करू नका'

नागरिकांना आवाहन करताना शक्तीकांत दास म्हणाले की, ''नोटा बदलण्यासाठी घाई करू नका. चार महिन्यांचा कालावधी आहे. आरामात नोटा बदला.''  (Latest Marathi News)

३० सप्टेंबरनंतर २००० च्या नोटांचे काय होईल?

३० सप्टेंबरनंतर २००० च्या नोटांचे काय होईल? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, ''३० सप्टेंबरनंतर २००० रुपयांच्या नोटा कायदेशीर राहणार नाही, असं आम्ही म्हटलेलं नाही.''

ते म्हणाले की, ''आम्हाला आशा आहे की ३० सप्टेंबरच्या आत जास्तीत जास्त २००० रुपयांची नोट परत येईल. त्यानंतरही या नोटा बाजारात राहिल्या तर यासंबंधित पुढील माहिती दिली जाईल.'' शक्तिकांता दास म्हणाले की, ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतची तारीख निश्चित करण्यात आली आहे जेणेकरून लोकांनी ती गांभीर्याने घ्यावी. नाही तर ही प्रक्रिया खूप लांबली असती.''

'स्वतःच्या खात्यात २००० च्या नोटा जमा करण्यास २०,००० रुपयांची मर्यादा नाही'

म्हणाले पुढे की, ''२००० रुपयांच्या नोटा बदलण्याची मर्यादा २०,००० रुपये आहे. पण जर एखाद्याला त्याच्या बँक खात्यात २००० रुपयांच्या नोटा जमा करायच्या असतील तर त्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स संपला,अखेर ठाकरेंच्या युतीचा मुहुर्त ठरला

१ महिन्यापूर्वीच बॉयफ्रेंडचं लग्न, बायको माहेरी गेली; रात्री विवाहित महिला घरी आली, सकाळी आढळला मृतदेह

मुंबईत मोठा भाऊ कोण? जागावाटपावरून महायुतीत तणाव? महापालिकेसाठी मित्रपक्षांचा प्लान की आणखी काही....

तुळजापुरात दोन गटात तुफान राडा; भाजप आणि मविआमधील नेत्यामध्ये हाणामारी |Video Viral

Bhakri Tips: नाचणीची भाकरी लाटताना कटा फुटतात? या सोप्या टीप्सने होईल अगदी गोल भाकरी

SCROLL FOR NEXT