Jayant Patil On ED Inquiry: 'ईडीच्या चौकशीला मी घाबरत नाही', जयंत पाटील यांची रोखठोक प्रतिक्रिया

ED Inquiry: 'याप्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही.', असं जयंत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.
Jayant Patil
Jayant Patil Saam Tv

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसशी (IL & FS) संबंधित कथित गैरव्यवहाराबाबत त्यांची ईडीकडून चौकशी (ED Inquiry) होणार आहे. ईडी कार्यालयात चौकशीला जाण्यापूर्वी जयंत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. 'याप्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. ईडीच्या चौकशीला मी घाबरत नाही.', असे ते म्हणाले.

Jayant Patil
PM Modi : पीएम मोदींचा जगभरात डंका! फिजी आणि पापुआ न्यू गिनीने सर्वोच्च नागरी पुरस्कारने केलं सन्मानित

जयंत पाटील यांनी सांगितले की, 'मला ईडीकडून जी नोटीस पाठवण्यात आली आहे त्यावर काहीच विषय लिहिलेला नाही. त्यावर फक्त आयएल आणि एफएसचा उल्लेख आहे. पण या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. याबाबत मला काहीच माहिती नाही. त्यांना काय जाणून घ्यायाचे आहे हे मला माहिती नाही. पण मी ईडीला चौकशीत सहकार्य करणार आहे. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी देईन.'

'शरद पवारांशी याबद्दल बोलणं झालं नाही. बऱ्याच लोकांचे काल आणि आज फोन आले. त्यांनी चौकशीबद्दल विचारणा केली. पण मला याबद्दल काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही. योग्य वेळ आल्यावर मी बोलेल. ईडी जी काय चौकशी करतील त्याला आदरपूर्वक उत्तर देईल. त्या कंपनीशी आणि या प्रकरणाशी माझा संबंध नाही. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारची कागदपत्र घेऊन आलो नाही.', असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Jayant Patil
Nitesh Rane On NCP : तू इथं का दिसताेयस, जयंत पाटलांच्या समर्थनार्थ आंदाेलकांना गेले फाेन ? नितेश राणे

कोहिनूर सीटीएनएलमधील आयएल अँड एफएस समूहाच्या इक्विटी गुंतवणुकीशी संबंधित जयंत पाटील यांची ही चौकशी आहे. दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर जयंत पाटील हे ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहिले आहेत. जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. या कार्यकर्त्यांनी ईडी आणि केंद्र सरकारचा निषेध केला आहे या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ईडी कार्यालयाच्या चारही बाजूच्या रस्त्यांवर पोलिसांकडून बॅरीकेटिंग करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com