PM Modi Papua New Guinea Visit: पीएम मोदींचा जगभरात डंका! फिजी आणि पापुआ न्यू गिनीने सर्वोच्च नागरी पुरस्कारने केलं सन्मानित

पीएम मोदींचा जगभरात डंका! फिजी आणि पापुआ न्यू गिनीने सर्वोच्च नागरी पुरस्कारने केलं सन्मानित
PM Modi conferred with Papua New Guinea and Fijian highest civilian award
PM Modi conferred with Papua New Guinea and Fijian highest civilian award Saam Tv

PM Modi Papua New Guinea Visit: जपानमधील जी-7 आणि क्वाड बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले आहेत. येथे त्यांनी फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलँड्स को-ऑपरेशनच्या (FIPIC) तिसऱ्या शिखर परिषदेला हजेरी लावली.

या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी पॅसिफिक क्षेत्रातील अनेक देशांच्या नेत्यांची भेट घेऊन मैत्रीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. जागतिक नेता म्हणून भारताच्या या पावलांसाठी पापुआ न्यू गिनी आणि फिजीच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या देशाचा सर्वोच्च सन्मान - 'कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी' प्रदान केला.

PM Modi conferred with Papua New Guinea and Fijian highest civilian award
PM Modi Papua New Guinea Visit: ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला, ते गरजेच्या वेळी आले नाही: पंतप्रधान मोदी

पॅसिफिक बेट राष्ट्रांची एकता आणि ग्लोबल साउथच्या नेतृत्वासाठी पापुआ न्यू गिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू' हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. पापुआ न्यू गिनीतील फार कमी अनिवासींना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

PM Modi conferred with Papua New Guinea and Fijian highest civilian award
PM Modi Visit Papua New Guinea: पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी मोदींचे केले चरण स्पर्श, गळाभेट घेऊन स्वीकारलं अभिवादन; Video

याशिवाय पॅसिफिक बेट देश प्रजासत्ताक पलाऊचे अध्यक्ष सुरंगेल एस. व्हीप्स ज्युनियर यांनी पंतप्रधान मोदींना 'अबकाल पुरस्कारा'ने सन्मानित केले. दोन्ही नेत्यांची ही भेट भारत-पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशन (FIPIC) शिखर परिषदेत झाली. (Latest Marathi News)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पापुआ न्यू गिनी (Papua New Guinea) येथे पोहोचले तेव्हा तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी पापुआ न्यू गिनीच्या विमानतळावर यजमान देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान मोदींचे चरणस्पर्श करून स्वागत केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com