PM Modi Papua New Guinea Visit: ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला, ते गरजेच्या वेळी आले नाही: पंतप्रधान मोदी

ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला, ते गरजेच्या वेळी आले नाही: पंतप्रधान मोदी
PM Modi Papua New Guinea Visit
PM Modi Papua New Guinea VisitSaam TV
Published On

PM Modi Papua New Guinea Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या पापुआ न्यू गिनी दौऱ्यावर आहेत. येथे ते तिसर्‍या भारत-पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशन (FIPIC) शिखर परिषदे सहभागी झाले. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांच्यासमवेत परिषदेचे सह-अध्यक्षता करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्ही (जेम्स मारापे) भारताला एक विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहू शकतात. तसेच त्यांनी मरापे यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील दिले.

एफआयपीसीची सुरुवात 2014 मध्ये मोदींच्या फिजी दौऱ्यादरम्यान करण्यात आली. चीन या भागात आपला लष्करी आणि राजनैतिक प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

PM Modi Papua New Guinea Visit
Sameer Wankhede Expressed Fear: अतीक अहमदसारखा माझ्यावर हल्ला होऊ शकतो, समीर वानखेडेंनी व्यक्त केली भीती

या परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, '''तुमचा डेव्हलपमेंट भागीदार असल्याचा भारताला अभिमान आहे. मानवतावादी मदत असो किंवा तुमचा विकास असो, तुम्ही भारताला एक विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहू शकता आणि त्यावर विश्वास ठेवू शकता.''

ते पुढे म्हणाले, ''आम्ही आमचा अनुभव आणि क्षमता तुमच्यासोबत कोणत्याही संकोचशिवाय शेअर करण्यास तयार आहोत. डिजिटल तंत्रज्ञान असो वा अवकाश तंत्रज्ञान, आरोग्य सुरक्षा असो वा अन्न सुरक्षा, हवामान बदल असो की इतर, आम्ही सर्व प्रकारे तुमच्यासोबत आहोत.'' (Latest Marathi News)

PM Modi Papua New Guinea Visit
Jayant Patil ED Notice: जयंत पाटील आज ईडी कार्यालयात होणार हजर; कार्यकर्त्यांकडून आंदोलनाला सुरुवात

कोरोना काळाचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, '''कोरोना महामारीचा सर्वाधिक परिणाम ग्लोबल साउथच्या देशांवर झाला. हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती, भूक, गरिबी, आरोग्य अशी अनेक आव्हाने आधीच होती. आता नव्या समस्या उभ्या राहिल्या आहेत.''

ते म्हणाले, ''ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो, ते गरजेच्या वेळी आपल्या पाठीशी उभे नसल्याची जाणीव झाली. मला आनंद आहे की भारत आपल्या पॅसिफिक बेट मित्रांच्या खांद्याला खांदा लावून अडचणीच्या काळात उभा राहिला. भारतात बनवलेली लस असो की जीवनावश्यक औषधे, गहू असो की साखर, भारत सर्व देशांना आपल्या क्षमतेनुसार मदत करत आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com