PM Modi Visit Papua New Guinea: पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी मोदींचे केले चरण स्पर्श, गळाभेट घेऊन स्वीकारलं अभिवादन; Video
PM Modi Visit Papua New Guinea: जपानमधील जी-7 शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पापुआ न्यू गिनी (Papua New Guinea) येथे पोहोचले. येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
पापुआ न्यू गिनीच्या विमानतळावर यजमान देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान मोदींचे चरणस्पर्श करून स्वागत केले. पापुआ न्यू गिनीला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारतातील पहिले पंतप्रधान आहेत.
मोदींसाठी मोडली जुनी परंपरा
पंतप्रधान मोदींचे हे स्वागत देखील खास आहे. कारण या देशात असा नियम आहे की, सूर्यास्तानंतर तेथे आलेल्या कोणत्याही नेत्याचे औपचारिक स्वागत केले जात नाही. मात्र पंतप्रधान मोदींचे आगमन होताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांच्यासाठी या देशाने आपली जुनी परंपरा मोडली आहे. (Latest Marathi News)
एफआयपीआयसी शिखर परिषदेत सामील होणार पंतप्रधान मोदी
फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक कॉर्पोरेशन (FIPIC) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी येथे आले आहेत. या बैठकीत 14 देशांचे नेते सहभागी होणार आहेत.
पापुआ न्यू गिनीला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी येथून थेट ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. तेथे ते अनेक कार्यक्रमात सहभागी होणार आहे. आतापासून ऑस्ट्रेलियात हॅरिस पार्क परिसर 'लिटिल इंडिया' म्हणून ओळखला जाईल. पंतप्रधानांच्या सामुदायिक कार्यक्रमादरम्यान याची घोषणा केली जाईल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.