Facebook Instagram SAAM TV
देश विदेश

Facebook Instagram: फेसबूक-इन्स्टाग्राम ठप्प होण्याचं नेमकं कारण काय? कंपनीने सविस्तर सांगितलं

Tech News: देशभरात फेसबुक तसेच इन्स्टाग्राम या प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सेवा (ता.५) मंगळवार रात्रीच्या दरम्यान विस्कळीत झाली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Why Facebook And Instagram Was Down

देशभरात फेसबुक तसेच इन्स्टाग्राम या प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची(platform) सेवा (ता.५) मंगळवार रात्रीच्या दरम्यान विस्कळीत झाली होती. साधारण एक तासांसाठी विस्कळीत झालेले हे फेसबुक आणि इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्म पुन्हा सुरु झाले.या दरम्यान सोशल मीडिया युजर्संचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट स्वता:हुन लॉगआऊट होत होते.मात्र आता फेसबुक तसेच इन्स्टाग्रामची सेवा विस्कळीत होण्यामागचे कारण समोर आले आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लहानापासून ते मोठ्यापर्यंतच्या वयोगटातील प्रत्येक व्यक्ती आता सोशल मीडियाचा वापर करत असतो. त्यातल्या त्यात प्रत्येक व्यक्ती हा फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात एक्टीव असतो. मात्र मंगळवार रात्री देशभरात मेटाच्या प्रमुख सेवा विस्कळीत झाल्या होत्या. त्या म्हणजे फेसबुक आणि इन्स्टाग्राम. भारतातच नाही तर जगभरात फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे कोटयवधी युजर्स आहे. या सेवा विस्कळीत झाल्यानंतर अनेक युजर्संनी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर यांच्या तक्रारी देत होते.

कोटयवधी युजर्संना त्यांच्या फेसबुक (Facebook)अकाऊंटचे एक्सेसही मिळत नव्हते तर दुसऱ्या बाजूला इन्स्टाग्रामर नवीन फीड अपडेट होत नव्हत्या तसेच अनेक यूजर्स रील्सही पाहू शकतं नव्हते. साधारण एक तासांसाठीही सेवा विस्कळीत झाली होती. परंतू मंगळवार रात्री उशिरा विस्कळीत झालेली सेवा पूर्ववत केली.

मंगळवार रात्री सेवा पूर्ववत झाली मात्र प्रश्न होता तो एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मची सेवा कोणत्या कारणास्तव विस्कळीत झाली होती. यामुळे अनेक यूजर्संन चिंतेत आले होते की त्यांचे अकाऊंट हॅक झाले. मात्र खरी गोष्ट तर वेगळीच होती. मेटा कंपनीची सेवा विस्कळीत होण्याचे मुख्य कारण तांत्रिक बिघाड होते. परंतू ,कंपनीने अजून या गोष्टीची पूर्ण माहिती दिलेली नाही.

नेमकं काय कारणं...

मेटाची सेवा विस्कळीत झाल्यानंतर यूजर्संनी वेबसाइट डाउन झाल्याची अनेक तक्रारी दिल्या होत्या. विस्कळीत झालेल्या सेवेनंतर मेटा कंपनीच्या प्रवक्तांनी सांगितले की, मंगळवार रात्री या समस्येचे निराकरण करण्यात आले आहे असून त्यांनी सर्व यूजर्संची माफीही मागितली आहे.

स्टोन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स एक पोस्ट केली त्यात त्यांनी लिहिले आहे की,' एका तांत्रिक समस्येमुळे लोकांना आमच्या काही सेवांमध्ये प्रवेश करण्यात अडचण आली. आम्ही शक्य तितक्या लवकर समस्येचे निराकरण केले आणि झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करत आहोत.

पूर्ववत...

मेटा कंपनीचे असलेले फेसबुक आणि इन्स्टाग्राम विस्कळीत झाल्यानंतर इकडचे सर्व यूजर्सं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मोठ्या प्रमाणावर एक्टीव असलेले दिसून आले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाउन झाल्या संदर्भात अनेक कीवर्डस् ट्रेंड होत होते तसेच अनेक मीम्स सुद्धा व्हायरल होत होते.

दरम्यान मेटा कंपनीचे सर्वेसर्वा असलेल्या ऐलॉन मस्कने एक्स प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे,ज्यात त्यांनी लिहिले आहे की, जर तुम्ही ही पोस्ट वाचत असाल, कारण आता ही सेवा व्यवस्थिक काम करत आहे' काही व्यक्तींना असे वाटत होते की त्यांचे अकाऊंट हॅग झाले असेल.परंतू असं काही नाही जर तुम्ही काही वेळानंतर तुम्ही फेसबुक आणि इन्स्टाग्राम लॉगिन केले असता ते पहिल्यासारखे सुरु झाले असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT