Bus and Truck Strike Saam Tv
देश विदेश

New Hit-and-Run Law:ट्रक चालकांनी का पुकारलं आंदोलन; सरकारच्या कोणत्या कायद्याचा होतोय विरोध

Bus and Truck Strike : नवी मुंबईत उरण, कळंबोली, उलवे याठिकाणी ट्रक चालकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन पुकारलं आहे. मुंबईच नाहीतर हरियाणा, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगालसह अनेक राज्यात ट्रक चालकांनी आंदोलन पुकारलंय. हे आंदोलन का केले जात आहे?

Bharat Jadhav

Why Bus and Truck Driver Call Strike :

देशातील विविध राज्यात ट्रक चालकांनी पुकारलेल्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागलंय.नवी मुंबईत उरण, कळंबोली, उलवे याठिकाणी ट्रक चालकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून नवी मुंबईत ट्रकचालकांनी पोलिसांना मारहाण केलीय. फक्त मुंबईच नाहीतर हरियाणा, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगालसह अनेक राज्यात ट्रक चालकांनी आंदोलन पुकारलंय.(Latest News)

काय होतंय आंदोलन

ट्रक चालकांनी (truck drivers) पुकारलेल्या आंदोलन (agitation) हे केंद्र सरकारने (Central government) बनवलेले कायद्याचे पडसाद आहेत. रस्ते अपघात आणि हिट-अ‍ॅण्ड रन प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने सरकारने (government) नवीन कायदा पारित केलाय. या कायद्याला ट्रक चालक आणि बस चालकांकडून विरोध केलाय जात आहे. कायद्याला चालकांकडून विरोध केला जात आहे. चालकांसाठी नवीन कायदा अस्तित्वात आणण्यात येत आहे. चालकांच्या हातून अपघात (accident) घडून त्यात कोणाचा मृत्यू झाल्यास त्यांना सरळ १० वर्षाचा तुरुंगवास आणि दंड ठोठवण्यात येणाचा कायदा पारित करण्यात आलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यापूर्वी, आयपीसी कलम ३० ४ अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत आरोपीला फक्त २ वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होत होता. दरम्यान सरकारच्या या नवीन कायद्यामुळे चालक आपले काम करण्यास तयार होणार नाहीत. तसेच नवीन कोणी चालक म्हणून नोकरी करणार नसल्याचा आरोप चालकांनी केलाय. ट्रान्सपोर्ट चालवणाऱ्यांच्या मते, कोणीही जाणून-बुजून अपघात करत नाही.

त्याचप्रमाणे जर ड्रायव्हर अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करेल किंवा तेथे थांबेल तर संतप्त नागरीक त्या चालकाला मारून टाकतील. यामुळे या काळ्या कायद्याला मागे घेण्यात यावेत, अशी मागणी केलीय जातं आहे. जर धुक्यामुळे अपघात झाला तर यात चालकाची चुकी कशी असेल. चूक न करता चालकाला १० वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागेल. अपघात झाल्यानंतर चालकांना स्थानिक नागरिक मारहाण करतात. यामुळे चालक तेथून फरार होत असतात, असं चालक म्हणत आहेत.

भंडारा जिल्ह्यातील २५० बसफेऱ्या रद्द

आंदोलनाचा फटका (MSRTC) एसटी महामंडळाला देखील बसला आहे. कायद्याच्याविरोधात चालकांनी आंदोलन पुकारलं असून नागपूर- कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर बंद पाडलाय. ट्रक चालकांनी पुकारलेल्या बंदचा फटका थेट भंडारा आगारातून सुटणाऱ्या बसवर पडला. भंडारा आगारातील नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या सकाळपासून सुमारे २५० बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहने अडवून आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर मोठ्या संख्येने वाहन चालक एकत्र आले होते. हिट अँड रन प्रकरणातील प्रस्तावित कायद्याअंतर्गत वाहन चालकांमध्ये प्रचंड नाराजी असून जिल्हा मोटार वाहक व मालवाहतूक असोसिएशन संघटनेने संप पुकारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: गुजरातच्या पोरबंदरवरून मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त

Maharashtra Politics : भाजपला विनंती, उद्धव ठाकरे म्हणाले मी बोलणी करायला तयार

Kitchen tips: हात खराब न करता चपातीचं पीठ कसं भिजवाल? पाहा एक सोपा देसी जुगाड

Ram-Leela Movie: रामलीला चित्रपटासाठी दीपिका पदुकोण नव्हती पहिली पसंती; तर या प्रसिद्ध अभिनेत्रीला  करण्यात आला होता रोल ऑफर...

Bajarang Sonawane : बीड जिल्ह्यात लोकसभेची पुनरावृत्ती निश्चित; खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास

SCROLL FOR NEXT