Tax On Cow Burps
Tax On Cow Burps Saam TV
देश विदेश

New Zealand News: न्यूझीलंड सरकारला गायींच्या 'ढेकर'वर का लावावा लागला कर? सरकारनं सांगितलं 'हे' मोठं कारण

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

New Zealand News: न्यूझीलंड देशातून एक विचित्र बातमी समोर येत आहे. न्यूझीलंड सरकारने चक्क गायींच्या (Cow) ढेकरवर कर लावला आहे, या घटनेने संपूर्ण जगाचं लक्षंं वेधून घेतलं आहे. सरकारच्या या निर्णयाला न्यूझीलंडमधील अनेक शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे. मात्र, न्यूझीलंडच्या सरकारला चक्क गायींच्या ढेकरवर कर (Tax) लावण्याची काय परिस्थिती ओढावली? याबाबत न्यूझीलंड सरकारने मोठं कारण देत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. (Tax on cow burping)

न्यूझीलंडमधील शेती हा मुख्य व्यवसाय आहे. या देशाची लोकसंख्या 50 लाख आहे, परंतु त्या तुलनेत एक कोटीपेक्षा जास्त गायी-म्हशी आणि 2.6 कोटी मेंढ्या आहेत. देशातील एकूण हरितगृह वायूंपैकी निम्मे उत्सर्जन शेतातून होते. विशेषत: गुरांच्या ढेकरमधून मिथेन गॅस मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो. त्यामुळे देशात कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी न्यूझीलंड सरकारने गायींच्या ढेकरवर कर लावला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे.

कार्बन उत्सर्जन मुक्त देश बनवण्यासाठी योजना

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी 2050 पर्यंत देशाला कार्बनमुक्त करण्याची योजना आखली आहे. 2030 पर्यंत शेतातील प्राण्यांपासून मिथेन उत्सर्जन 10 टक्के आणि 2050 पर्यंत 47 टक्क्यांनी कमी करण्याचा या योजनेत समावेश आहे. मात्र, सरकारच्या या योजनेच्या विरोधात शेतकरी गुरुवारी रस्त्यावर उतरले. 'ग्राउंड्सवेल न्यूझीलंड' समूहाच्या मदतीने देशभरातील गावे आणि शहरांमध्ये 50 हून अधिक ठिकाणी निदर्शने करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonakshi Sinha Wedding Gift: सोनाक्षीला नवऱ्याने दिलं महागंड गिफ्ट; अलिशान कारची किंमत आहे कोटीमध्ये

Vitthal Rukmini Mandir Pandharpur: विठ्ठल भक्तीतून 8 महिन्यांत 30 लाखांची देणगी, पंढरपूर मंदिर समितीकडून राहुरीमधील भाविकाचा सन्मान

Suryakanta Patil: भाजपची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या सूर्यकांता पाटील कोण?

Ratnagiri Building Collapsed : मोठी बातमी! रत्नागिरीतील खेडमध्ये दुमजली इमारत अक्षरश: पत्त्यासारखी कोसळली, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीची महत्वाची बैठक

SCROLL FOR NEXT