Shirdi Bus Video: नगर-मनमाड महामार्ग पाण्याखाली; प्रवाशांनी भरलेली बस पाण्यात अडकली

Shirdi Bus Video: जलमय झालेल्या रस्त्यावरुन जाण्याचं धाडस केल्यानं कर्नाटक-शिर्डी बस एका पूराच्या पाण्यात अडकल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती.
Shirdi Bus Video
Shirdi Bus Videoसचिन बनसोडे

सचिन बनसोडे, शिर्डी

Shirdi Latest News: राज्यात परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने जोरदार (Heavy Rain) बॅटींग केल्याने पूरपरिस्थिती बनली आहे. मात्र, अशातही नागरिक जीवघेणा प्रवास करत आहेत. जलमय झालेल्या रस्त्यावरुन जाण्याचं धाडस केल्यानं कर्नाटक-शिर्डी बस एका पूराच्या पाण्यात अडकल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. (Bus stuck in flood water)

पाहा व्हिडिओ -

मिळालेल्या माहीतीनुसार, कर्नाटक परिवहन मंडळाची बस रस्त्यातच अडकली होती. नाशिकच्या शिर्डीमध्ये (Shirdi) जोरदार पावसाने शिर्डीनजीक असलेला नगर-मनमाड महामार्ग पाण्याखाली गेला होता, त्यामुळे या रस्त्यात शेकडो वाहने अडकली होती. रात्रभर झालेल्या ढगफुटी सदृष्य पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली, यामुळे महामार्गा शेजारील ओढ्याला पूर आला होता. अशात एका बस चालकाने प्रवाशांनी भरलेली बस पाण्यातून नेण्याचे धाडस केले आणि ते त्याच्या अंगलट आले. (Maharashtra News)

Shirdi Bus Video
Bhaskar Jadhav : राणे कुटुंबीयांवरती टीका केल्यामुळे भास्कर जाधव अडचणीत; पुण्यात गुन्हा दाखल

ही बस एक तास पूराच्या पाण्यात अडकली होती, ज्यात प्रवासीही होते. यामुळे बसचालकाची चांगलीच फजिती झाली होती. बस पाण्यात अडकल्यानंतर स्थानिक नागरिकांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने बस बाहेर काढली. नगर-मनमाड महामार्ग पाण्याखाली गेला तरीही अनेक वाहनधारक या रस्त्यावरुन जीवघेणा प्रवास करत आहेत. याकडे स्थानिक प्रशासनाकडून मात्र अद्यापही उपाययोजना केल्या नसल्याने काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com