Corona wave saam Tv
देश विदेश

Covid19: कोरोनाची लाट परत का आली? WHOनं सांगितला कोविडपासून वाचण्याचा उपाय

Corona wave: मागील महिन्यात जगभरात कोरोनाचे एकूण ८,५०,००० नवीन रुग्ण आढळून आलेत. तर जगभरात ३,००० हजार जणांचा मृत्यू झालाय. जागतिक पातळीवर रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या २३ टक्क्यांनी वाढलीय.सध्या श्वसनाचे आजार, इन्फ्लूएंझा, आरएसव्ही आणि न्यूमोनिया यांसारखे आजारही पसरत आहेत.

Bharat Jadhav

Corona Wave Come Back:

कोरोना महामारीची लाट परत एकदा आलीय. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागलीय. एका महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या ५२ टक्क्यांनी वाढल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनने दिलीय. मागील महिन्यात जगभरात कोरोनाचे एकूण ८,५०,००० नवीन रुग्ण आढळून आलेत. तर जगभरात ३,००० हजार जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान मागील महिन्यात मृतांची संख्या ८ टक्क्यांनी कमी झालीय. (Latest News)

आतापर्यंत कोरोनामुळे ७० लाख जणांचा मृत्यू

१७ डिसेंबरपर्यंत जगभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७७ कोटींहून अधिक झाली आहे. तर आतापर्यंत ७० लाख लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिलीय. जागतिक स्तरावर १,१८,००० कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी १६०० हून अधिक रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. कोरोनाचे रुग्ण आढळत असताना जागतिक पातळीवर रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या २३ टक्क्यांनी वाढलीय. आयुसीयूमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्येत ५१ टक्क्यांनी वाढ झालीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन-१ चे प्रकरणे वाढू लागली आहेत. जागितक आरोग्य संघटनेने जेएन-१ च्या व्हेरियंटला व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट नाव दिलंय. दरम्यान जेएन- १ व्हेरियंटला अद्याप धोकादायक मानलं जात नाहीये. परंतु थंडी वाढल्यामुळे विविध देशात श्वासनसंबंधी होणाऱ्या आजाराचा धोका वाढू शकतो. जागतिक आरोग्य संघटना या व्हेरियंटवर लक्ष ठेवून आहे.

संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जेएन-१ किती धोका आहे हे सांगता येईल असं आरोग्य संघटनेनेकडून सांगण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोनाच्या या व्हेरियंटशी लढण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या लसी पुरेशा आहेत. कोरोनाचा व्हेरियंट जेएन-१ वर उपाय म्हणून सध्या उपलब्ध असलेल्या लसी वापरता येतील असं आरोग्य संघटनेने सांगितले आहे.

सध्या कोरोनाच नाही तर श्वसनाचे आजार, इन्फ्लूएंझा, आरएसव्ही आणि न्यूमोनिया यांसारखे आजारही पसरत आहेत. यामुळे लोकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचा आणि सामाजिक अंतर पाळावे असा दिला गेलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT