MP, Rajasthan, Chhattisgarh Elections Survey Saam Tv
देश विदेश

Upcoming Elections: मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कोणाची येणार सत्ता? मागील चार सर्वेक्षणांचे जाणून घ्या निकाल

MP, Rajasthan, Chhattisgarh Elections Survey: मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कोणाची येणार सत्ता? मागील चार सर्वेक्षणांचे जाणून घ्या निकाल

Satish Kengar

MP, Rajasthan, Chhattisgarh Elections Survey:

यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवर अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

या तीन राज्यांतील निवडणुकांना पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून पाहिलं जात आहे. अशातच अनेक सर्वेक्षणे समोर आली आहेत. ज्यात या राज्यांबाबत निवडणुकीचे भाकीत करण्यात आले आहे. यातच गेल्या चार सर्वेक्षणांचे निकाल आज आपण जाणून घेणार आहोत.

इंडिया टीव्हीच्या सर्वेक्षणात कोण आघाडीवर?

'इंडिया टीव्ही'साठी ईटीजीने या तिन्ही राज्यांमध्ये सर्वेक्षण केले. सर्वेक्षणानुसार मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर आहे. मध्य प्रदेशात 230 जागांपैकी काँग्रेसला 118-128 जागा मिळू शकतात, असं सर्वेक्षणात भाकीत मांडण्यात आलं आहे. तर भाजप 102-110 जागा जिंकू शकतो. राजस्थानमध्ये भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते. (Latest Marathi News)

एकूण 200 जागांपैकी भाजप 95-105 जागा जिंकू शकतो. तर काँग्रेसला 91-101 जागा मिळू शकतात. छत्तीसगडबाबतही काँग्रेससाठी आनंदाची बातमी आहे. 90 जागांपैकी काँग्रेसला 48-60 जागा मिळू शकतात, असे सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. तर भाजप 28-40 जागा जिंकू शकतो.

IANS-Polstrat च्या सर्वेक्षणात कोणी मारणार बाजी?

निवडणूक राज्यांबाबत IANS-Polstrat चे सर्वेक्षणही समोर आले आहे. सर्वेक्षणानुसार मध्य प्रदेशात भाजपचे सरकार बनू शकते. एकूण 230 जागांपैकी भाजप 116-124 जागा जिंकू शकतो. तर काँग्रेसला 104 जागा मिळू शकतात. राजस्थानमधील 200 जागांपैकी काँग्रेसला 97 ते 105 जागा मिळू शकतात. तर भाजपला 89-97 जागा मिळू शकतात. छत्तीसगडमध्ये 90 जागांपैकी काँग्रेसला 62 जागा मिळू शकतात आणि 27 जागा भाजपच्या खात्यात जाऊ शकतात.

न्यूज 24 नेही मांडलं भाकीत

पीईएसीएस मीडिया आणि न्यूज 24 ने निवडणूक राज्यांमध्ये सर्वेक्षण केले. सर्वेक्षणानुसार मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत आहे. 230 जागांपैकी भाजपला 115-122 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 105-115 जागा मिळू शकतात. राजस्थानमध्ये भाजपला 200 पैकी 95-105 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 91-101 जागा मिळू शकतात. छत्तीसगडमध्ये 90 पैकी 55-60 जागा काँग्रेसच्या खात्यात जाऊ शकतात आणि भाजपला 30-35 जागा मिळू शकतात.

टाईम्स नाऊ नवभारत सर्वेक्षणही आला समोर

टाईम्स नाऊ नवभारतने आगामी निवडणूक होणार आहे त्या राज्यांमध्ये सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणानुसार, मध्य प्रदेशातील एकूण 230 जागांपैकी काँग्रेसला 118-128 जागा मिळू शकतात. तर भाजप 102-110 जागांवर विजय मिळवू शकतो. राजस्थानमधील एकूण 200 जागांपैकी भाजपला 95-105 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 91-101 जागा मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वसईत हिंतेद्र ठाकूर आघाडीवर

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

SCROLL FOR NEXT