Haryana Congress CM Face Saam Tv
देश विदेश

Haryana CM Face: काँग्रेस जिंकली तर हरियाणाचा मुख्यमंत्री कोण होणार? 'ही' दोन नावे आघडीवर

Haryana Assembly Election 2024 : हरियाणात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपन्न झालं असून अनेक एक्झिट पोलमध्ये येथे काँग्रेसची सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यातच काँग्रेसचा येथे कोण असेल मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? जाणून घेऊ...

Satish Kengar

हरियाणात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अनेकांचं भवितव्य मतपेटीत बंद झाल्यानंतर अनेक एक्झिट पोल समोर आले आहेत. ज्यामध्ये हरियाणात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. आता हायकमांड भूपेंद्र हुडा यांच्याकडे राज्याची धुरा सोपवणार की धक्कादायक निर्णय घेऊन कुमारी शैलजा यांच्या नावाची घोषणा करणार, हा प्रश्न आहे.

हरियाणात सध्या फक्त 2 चेहरे आहेत. यापैकी एकाचे नाव हायकमांड जाहीर करेल, असे मानले जात आहे. एक्झिट पोलनुसार हरियाणात काँग्रेसला बंपर जागा मिळताना दिसत आहेत. एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे भूपेंद्र सिंह हुड्डा माध्यमांसमोर आले आहेत. मुख्यमंत्रीपद त्यांनाच मिळेल, असा त्यांना आत्मविश्वास आहे.

ते म्हणाले आहेत की, 8 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. त्यानंतर सीएलपीची बैठक होईल. यानंतर हायकमांड ठरवणार मुख्यमंत्री कोण होणार. हुड्डा म्हणाले की, राज्यात काँग्रेसची लाट आहे. प्रचंड बहुमताने सरकार स्थापन होणार आहे. 2005 ते 2014 पर्यंतच्या आमच्या सरकारने चांगलं काम केलं. तसेच 2014-2024 मधील सरकारचे अपयश जनतेला माहीत आहे. काँग्रेसचे सरकार आल्यास बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि शिक्षणावर काम केले जाईल.

मुख्यमंत्रिपदाबाबत हुड्डा म्हणाले की, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला या पदावर दावा करण्याचा अधिकार आहे. हायकमांड जो काही निर्णय घेईल, तो त्यांना मान्य आहे. कुमारी शैलजा यांच्या दाव्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, त्या (कुमारी शैलजा) आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत.

दरम्यान, यावेळी कुमारी शैलजा तिकीट वाटपाबाबत संतप्त दिसल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हुड्डा यांनी आपल्या समर्थकांना 73 तिकिटांचे वाटप केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अशातच काँग्रेस हुड्डा यांना राज्याची धुरा देणार की, हायकमांड वेगळा काही निर्णय घेणार हे येत्या 48 तासांत स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT