Deadly Virus Google
देश विदेश

Deadly Virus : दक्षिण आफ्रिकेच्या नव्या विषाणूने जगाची झोप उडवली; एका झटक्यात जातोय जीव

Deadly virus news update : दक्षिण आफ्रिकेच्या नव्या विषाणूने जगाची झोप उडवली आहे. या गुढ आजारामुळे नागरिकांचा एका झटक्यात जीव जात आहे. त्यामुळे लोकांमध्ये दहशत पसरली आहे.

Vishal Gangurde

इबोला आणि झिका व्हायरसनंतर आता दक्षिण आफ्रिकेतील आणखी एका विषाणूने सर्वांची झोप उडवली आहे. मध्य आफ्रिकेतील कॉन्गोमध्ये विषाणूमुळे काही दिवसांत ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने नव्या विषाणूपासून सावध केलं आहे. नव्या विषाणूमुळे गेल्या ४८ तासांत अनेक जणांनी जीव सोडले आहेत.

कॉन्गोमध्ये २१ जानेवारी रोजी नव्या विषाणूविषयी माहिती समोर आली. नव्या विषाणूने आतापर्यंत ४१९ लोक बाधित झाले आहेत. ९ फेब्रुवारी रोजी बोमेटे शहरात मृतांचा आकडा वाढू लागला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, बोलोको शहरात तीन मुलांनी वटवाघूळ खाल्ले होते. त्यामुळे त्यांना ताप आला होता. त्यानंतर ४८ तासांनंतर त्यांचा मृत्यू झाला.

मागील काही वर्षात आफ्रिका आणि आशिया सारख्या भागात प्राण्यांपासून माणसांमध्ये आजार बळावू लागले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, २०२२ साली मागील दशकात दक्षिण आफ्रिकेत या प्रकारच्या आजारांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक मोठी वाढ झाली आहे. आफ्रिकी देश कॉन्गोमध्ये गूढ आजाराने आतापर्यंत ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, नव्या विषाणूची लागण होताच रुग्ण जीव सोडत आहेत. गुढ आजारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, काही महिन्यांपूर्वी देखील काँगोमध्ये फ्लू सारख्या आजाराने खळबळ उडवून दिली होती. गुढ आजारामुळे १५० लोकांचा मृत्यू झाला होता. काँगोमधील पांजी राज्यातील मागील वर्षीच्या १० नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरदरम्यान गुढ आजाराने अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यात लहान मुले आणि महिलांचा समावेश होता. गुढ आजाराचे लक्षणे हे ताप, डोकेदुखी, खोकला आणि अॅनिमिया आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT