Vaibhav Kale Saam Tv
देश विदेश

Who Is Vaibhav Kale: इस्त्रायल-हमास युद्धात शहीद झालेले भारतीय लष्करी अधिकारी वैभव काळे कोण होते? २२ वर्षे केली होती देशसेवा

Vaibhav Kale : इस्त्रायलच्या हल्ल्यात सोमवारी भारतीय जवान वैभव काळे यांचा मृत्यू झाला आहे. वैभव काळे हे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात संरक्षण समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इस्त्रायलच्या हल्ल्यात सोमवारी भारतीय जवान वैभव काळे यांचा मृत्यू झाला आहे. वैभव काळे हे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात संरक्षण समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत होते. राफा शहरातून युनूस भागात हॉस्पिटलच्या वाहनातून प्रवास करताना त्यांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांचे उपप्रवक्ते फरहान हक यांनी निवेदनातून ही माहिती दिली आहे.

यूएनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव काळे एका महिन्यापूर्वीच यूएनमध्ये सुरक्षा सेवा समन्वयक म्हणून रुजू झाले होते. ते संयुक्त राष्ट्रांच्या वाहनातून प्रवास करत होते. त्या वाहनावर गोळीबार करण्यात आला. यातच त्यांचा मृत्यू झाला.

वैभव काळे हे फक्त ४६ वर्षांचे होते. त्यांचे बालपण नागपुरात गेले. ते पुण्यात स्थायिक झाले. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुलं आहेत. पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय सुरक्षा अकादमीतून त्यांनी लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्यांनी जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या ११ व्या बटालियनमध्ये २०२० ते निवृत्तीपर्यंत काम केले. त्यांनी लष्करात २२ वर्षे सेवा केली.

वैभव काळे यांनी २०२२ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी दोन खासगी कंपन्यांमध्ये नोकरीही केली. यानंतर त्यांनी संयुक्त राष्ट्रांत काम करण्यास पसंती दिली. त्यांनी संरक्षण समन्वयक अधिकारी म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Pawan Singh: पिल्स खायला दिल्या, अबॉर्शन करायला भाग पाडलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे धक्कादायक आरोप

Maharashtra Live News Update: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती

अपघातात मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी केक कापला; स्मशानभूमीतच वडिलांकडून लेकीचं वाढदिवस साजरा

Political News : भाजपचं टेन्शन वाढलं, बिहारमध्ये जागावाटपावरून केंद्रीय मंत्री नाराज, थेट ऑफर धुडकावली

SCROLL FOR NEXT