देश विदेश

Israel and Palestine: कोण आहे हमासचा प्रमुख; का अन् कधी केली हमासची स्थापना? काय होता वाद?

Israel and Hamas Conflict: हमासनं इस्राइलवर समुद्र, हवाई , जमिनीवरुनही गोळीबार करत हल्ला चढवलाय.

Bharat Jadhav

Israel and Hamas Conflict:

हमासनं इस्राइलवर पहिल्यांदा इतकं मोठं मिलिट्री ऑपरेशन केलंय. हमास पॅलेस्टाईनच्या सुरक्षा कवच आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हमासनं इस्राइलवर समुद्र, हवाई , जमिनीवरुनही गोळीबार करत हल्ला चढवलाय. आधुनिक शस्त्रास्त्रे असणाऱ्या इस्राइलशी पंगा घेणारा हमास आहे तरी काय? का आणि कधीपासून हमास इस्राइलचा शत्रू बनवलाय. साधरण २६ वर्षापूर्वी या हमासची सुरूवात झाली होती. याची काय कहाणी आहे, याची माहिती घेऊ..(Latest News)

हमास ही दहशतवादी संघटना जगभरात प्रसिद्ध आहे. गैर-इस्लामिक देश या संघटनेला दहशतवादी, बंडखोर संघटना म्हणतात. या संघटनेची सुरुवात देशाचे रक्षण करण्यासाठी, शहरांचे रक्षण करण्यासाठी आणि आक्रमणकर्त्या इस्रायलींना उखडून टाकण्यासाठी झाली होती. हमास एक आंदोलन आहे. इस्राइलच्या आक्रमणाला प्रतिरोध करण्यास त्याला परतून लावण्यास हमास सक्षम आहे.इस्राइलनं संपूर्ण देशावर कब्जा केलाय. इस्राइलची मानसिकता विस्तारवादी आहे. आज पॅलेस्टाईन नष्ट होण्याच्या स्थितीत आहे.

दरम्यान हमास नेहमी इस्राइलचा कट्टर शत्रू राहिलाय. या संघटनेची सुरुवात पॅलेस्टाईनच्या एका छोट्या गावापासून सुरू झालीय. या गावातील शेख अहमद यासीननं याची सुरुवात केलीय. इस्राइलनं यासीनंच्या गावावर बुलडोझर चालवला होता. सन १९४८ मध्ये पॅलेस्टाईनच्या अनेक गावांवर इस्राइलनं ताबा घेतला होता. त्यावळे इस्राइलनं पॅलेस्टाईन नागरिकांच्या घरांवर बुलडोझर चालवला होता. १९३६ मध्ये पॅलेस्टाईनच्या अल-जुरा गावात जन्मलेल्या यासीन यांच्या गावावरही इस्राइलनं १९४८ बुलडोझर चालवला होता.

बेघर झाल्यानंतर यासीन आपल्या कुटुंबियांसोबत गाझा पट्टीवर स्थायिक झाले. ही घटना तेव्हा झाली तेव्हा तो १२ वर्षाचा होता. यासीननं १९५९मध्ये मिस्रीच्या ऐन शम्स विद्यापीठातून शिक्षण घेतलं. आर्थिक अडचणी असल्यामुळे त्याला शिक्षणमध्ये सोडून द्यावे लागलं. ते मिस्त्रच्या मुस्लीम ब्रदरहुडनं यासीनवर मोठा प्रभाव टाकला होता. त्याच प्रभावाखाली येत यासीन परत गाझा येथे परत आला. इस्लामचं शिक्षण आणि अरबी शिकल्यानंतर यासीन एक धार्मिक नेता बनला.

अहमद यासीनने हमास कधी आणि का निर्माण केली?

१९८३ मध्ये गाझामध्ये असलेल्या शेख यासीनला इस्राइलच्या सैन्यानं अटक केली होती. एक संघटना बनवणं आणि शस्त्र ठेवण्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. त्यासाठी यासीनला १३ वर्ष तुरुंगवास भोगावा लागला होता. दोन वर्षानंतर कैद्यांच्या अदला-बदलीनुसार त्याला सोडण्यात आलं. त्यानंतर १९८७मध्ये त्याने हमासची स्थापना केली. त्यावेळी तो गाझामधील मुस्लीम ब्रदरहुडचा नेता होता. त्यानंतर १९८९ मध्ये परत त्याला अटक करण्यात आली होती.

ावेळी त्याला ४० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. यावेळी त्याच्यावर हत्येचा आरोप होता. हिंसा भडकावण्यास आणि इस्राइलच्या सैन्याची हत्या करण्याची आदेश दिल्याचा आरोप त्याच्यावर होता. यासीनला ११ मुलं होती. त्याने ११ वर्ष तुरुंगवास भोगला. यासीनला वाचवण्यासाठी त्याचे दोन मुलांनी स्वत: हून तुरुंगात गेले होते. हमासचा नेता म्हणून, अहमद यासीनने इस्रायली कब्जांविरुद्ध सशस्त्र प्रतिकाराची वकिली केली.

इस्राइलशी वाटाघाटी करणाऱ्या पॅलेस्टिनी प्राधिकरणावरही तो टीका करायचा. पॅलेस्टाईन प्राधिकरण गैर-इस्त्राइल लोकांच्या ताब्यात असलेल्या ठिकाणांवर प्रशासक म्हणून देखरेख करते. काही भागात इस्राइल आणि पॅलेस्टाईन प्राधिकरणाची संयुक्त सत्ता आहे, पण इस्त्राइलचे वर्चस्व जास्त आहे. इस्राइल आणि जॉर्डनचे राजे हुसेन यांच्यात झालेल्या करारानंतर यासीनची १९९७ मध्ये सुटका करण्यात आली होती. यानंतर ते सतत आजारी राहत असायचा. तुरुंगात त्याने त्याचा डोळा गमवावा लागला.

वयानुसार त्याला श्वसनाचे आजार जडले. यादरम्यान, इस्राइल आणि पॅलेस्टाईन यांच्यात संघर्ष सुरूच होता. सप्टेंबर २००० मध्ये झालेल्या बंडावेळी यासीनने इस्राइलशी अनेकवेळा युद्धविरामचा प्रस्ताव ठेवला. पश्चिम किनारा, गाझा पट्टी, आणि आधीच्या यरुशलममधून इस्त्राइलनं सैन्य माघारी न्यावे अशी मागणी यासीननं केली. तसेच पॅलेस्टाईन नेत्यांची हत्या करू नये अशी, विनंती यासीननं केली. त्यानंतर इस्राइलनं त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला.

सप्टेंबर २००३ मध्ये इस्त्राइलच्या सैन्यानं एफ-१६ फायटर जेटनं गाझा पट्टीवर बॉम्ब हल्ला केला. यात तो जखमी झाला. त्यानतंर २२ मार्च २००४ च्या रोजी नमाज पडण्यास जात असताना इस्त्राइलनं हेलिकॉप्टर स्ट्राइक केलं. यात इतर ९ लोकांसह यासीनचा मृत्यू झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT