Global cancer burden rises as WHO warns of sharp increase in cases by 2050 saam tv
देश विदेश

जगाला कॅन्सरला विळखा, WHOच्या अहवालानं जगभरात खळबळ

Rising Cancer Burden: कॅन्सर हा लोकांच्या मनात भीती निर्माण करणारा आजार आहे. त्याचा संबंध अनेकदा मृत्यूशी जोडला जातो. आधीच भारतामध्ये कॅन्सरचा वाढता प्रादुर्भाव चिंतेची बाब ठरलेली असताना जागतिक आरोग्य संघटनेनं मोठा इशारा दिलाय. पाहूया यावरचा एक रिपोर्ट...

Saam Tv

कॅन्सर हा गंभीर स्वरुपाचा आजार असून काही प्रकारच्या कॅन्सरवर उपचार प्रभावी ठरत आहेत, तर काही प्रकारांवरील उपायांचा अजूनही शोध घेतला जात आहे. अशातच आता जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानं जगाला धडकी भरवलीये. या अहवालानं जगभरातील आरोग्य व्यवस्थेसमोर कसं नवं आव्हान उभं राहिलंय ते पाहा...

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगातील 5 पैकी 1 व्यक्तीला कॅन्सरचा धोका आहे. तसंच, 92% लोकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होण्याची चिन्हे आहेत. तर 2050 पर्यंत रुग्णांची संख्या 3.5 कोटींवर जाणार असल्याचं संघटनेनं म्हटलंय. विशेष म्हणजे, कॅन्सरमुळे आई गमावणाऱ्या मुलांच्या संख्येत भारताचा क्रमांक जगातील पहिल्या 6 देशांमध्ये आहे. तसंच, जगातील एकूण कॅन्सर रुग्णांपैकी 50% रुग्ण आणि 56% मृत्यू एकट्या आशियात असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलंय. तंबाखू, मद्यपान, लठ्ठपणा आणि प्रदूषण रोखल्यास 40% केसेस टाळणं शक्य असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालावर चिंता व्यक्त करताना वाढत्या प्रदूषणामुळेही कॅन्सर रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. विशेष म्हणजे, जागतिक आरोग्य संघटनेच्या विश्लेषणानुसार भारतातील सुमारे 37 टक्के कर्करोग पूर्णपणे टाळता येण्यासारखे आहेत. मात्र, असं असलं तरी भारतामध्ये कॅन्सरचे निदान बहुतांश वेळा उशिरा होत असल्याचंही या अहवालातून समोर आलंय. संतुलित आहार, नियमित व्यायाम, लसीकरण आणि वेळेवर तपासणी यांसारख्या उपायांतून कॅन्सर रोखता येऊ शकतो. त्यामुळे उपचारापेक्षा प्रतिबंधावर अधिक भर देण्याची गरजही तज्ज्ञांनी या अहवालातून व्यक्त केलीये. तर दुसरीकडे, भारतात विविध योजनांच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात भारतीय आरोग्य व्यवस्थेसमोर कॅन्सरविरोधातील लढाईचं मोठं आव्हान असणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची विशेष सुनावणी

High Cholesterol: दररोज सकाळी रिकाम्या पोटी खा या 5 बिया; नसांमधील खराब कोलेस्ट्रॉल झटक्यात वितळेल

Pune Tourism : पावसाळ्यात धबधबा पाहण्याचा आनंद काही औरच! पुण्यात लपलाय 'हा' निसर्गाचा अद्भुत चमत्कार

Train Fire : स्टेशनवर ट्रेन पोहोचताच इंजिनला भीषण आग, डब्यांमध्ये पसरला धूर; प्रवाशांनी खिडक्या-दारातून मारल्या उड्या

Famous Actress : शिवीगाळ अन् चारित्र्यावर संशय; प्रसिद्ध अभिनेत्रीचे पतीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT