Khan Sir : बिहारमधील विद्यार्थ्यांना भडकवणारे कोण आहेत हे खान सर? जाणून घ्या संपूर्ण माहिती Saam TV
देश विदेश

Khan Sir : बिहारमधील विद्यार्थ्यांना भडकवणारे कोण आहेत हे खान सर? जाणून घ्या संपूर्ण माहिती

रेल्वे परीक्षांमधील घोटाळ्यामुळे बिहारमध्ये जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं असता विद्यार्थ्यांच्या वक्तव्याच्या आधारे GS Research Center कोचिंगचे संचालक YouTuber खान सर यांचही नाव समोर आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पटना : रेल्वे भरतीच्या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करत बिहारमधील विद्यार्थी आक्रमक झाले होते. या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच हिंसक वळण लागले होते. संतप्त विद्यार्थ्यांनी रेल्वे पेटवून दिली होती. शिवाय याप्रकरणी आता एकूण ४०० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व प्रकरणामध्ये एक नाव चर्चेत येत असून हिंसा भडकवल्या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखलं करण्यात आला आहे. ते म्हणजे लोकप्रिय नाव खान सरांचे (Khan Sir) आहे. शेवटी, खान सर कोण आहेत आणि ते विद्यार्थ्यांमध्ये इतके का प्रसिद्ध आहेत, चला जाणून घेऊया

मुलांना शिकविण्याच्या अनोख्या अंदाजामुळे लोकप्रिय

रेल्वेच्या आरआरबी-एनटीपीसी (RRB-NTPC) परीक्षांमधील घोटाळ्यावरुन विद्यार्थ्यांचा विरोध सुरू असून या प्रकरणामुळे बिहारमध्ये (Bihar) जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. 24 जानेवारी रोजी पटनाच्या राजेंद्र नगर टर्मिनलवर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला तेव्हा पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं असता विद्यार्थ्यांच्या वक्तव्याच्या आधारे जीएस रिसर्च सेंटर (GS Research Center) कोचिंगचे संचालक आणि YouTuber खान सर यांचही नाव समोर आलं आहे.

खान सरांचे सोशल मीडीया देशभरातील प्रचंड चाहते आहेत. खान सरांचे पूर्ण नाव आहे फैजल खान ते मूळचे गोरखपूर, उत्तर प्रदेशचे आहेत. कोचिंग सेंटर चालवण्यासोबतच ते प्रसिद्ध यूट्यूबवर असून ते मोफत क्लासेस ही घेतात. त्यांची शिकवण्याची शैली इतर शिक्षकांपेक्षा वेगळी असल्याने ते विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

वडील भाऊ दोघेही सैन्यात -

खान सर म्हणजेच ​​फैजल खान हे लहानपणापासूनच त्यांची अभ्यासामध्ये चांगली प्रगती होती. त्यामुळे ते आताही चांगल्या प्रकारे मुलानांही शिकवतात तसंच खान सरांचे वडील भारतीय लष्करात (Indian Army) अधिकारी आहेत आणि त्यांचा मोठा भाऊ देखील सैन्यात आहेत. आणि यामुळेच खान सरांनी देखील सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला होता, 12वी उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी NDA ची परीक्षा दिली होती मात्र यामध्ये त्यांची निवड होऊ शकली नाही.

हे देखील पहा -

यानंतर खान सरांनी स्वत: कोचिंग द्यायला सुरुवात केली. यानंतर, जेव्हा त्यांनी यूट्यूबवरती सामान्य अभ्यासाचे वर्ग द्यायला सुरुवात केली तेव्हापासून ते उत्तर प्रदेश आणि बिहारसह संपुर्ण विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रसिद्ध झाले. त्यांचे छोटे छोटे व्हिडीओ देखील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात स्टेटसला स्टोरीला टाकत असतो. तसंच खान सरांनी सामान्य ज्ञान आणि विज्ञान अशा विषयांवरती पुस्तकंही लिहिली आहेत.

दरम्यान, खान सरांचा राजकारणाशीही संबंध असल्याचं समोर येत आहे. बिहार पंचायत निवडणुकीमध्ये गणिताचे शिक्षक असणारे विपिन सर निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी खान सर त्यांच्यासाठी मते मागताना दिसतं होते. विपिन सर त्यांच्या लोकप्रियतेमुळेच जिंकले आता त्यानंतर खान सरांचाही राजकीय हेतू असल्याचं बोललं जात आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Eknath Shinde: शिंदेंची ताकद वाढली! अपक्ष आमदारासाठी थेट हेलिकॉप्टरच पाठवलं

Eknath Shinde Press Conference: साष्टांग दंडवत! शिंदे- फडणवीस- पवार लाडक्या मतदारांसमोर नतमस्तक; पाहा VIDEO

Amit Thackeray: मुंबईत राज ठाकरेंना धक्का, अमित ठाकरेंचा पराभव; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने मैदान मारलं

Maharashtra Politcs : सहानभुती संपली, मविआ हारली; आघाडीच्या पराभवाची कारणे काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT