EPFO Update SAAM TV
देश विदेश

Provident Fund : तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे कधीपर्यंत येतील? EPFO ने दिली मोठी अपडेट

EPFO Update : तुमच्या पीएफ खात्यात कधीपर्यंत व्याजाची रक्कम जमा होईल? ईपीएफओने दिली मोठी अपडेट. जाणून घ्या

Nandkumar Joshi

PF Interest Money : भविष्यनिर्वाह निधी अर्थात पीएफ खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. पीएफ खात्यात जमा झालेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेबाबत EPFO ने मोठी अपडेट दिली आहे. चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आहे. मात्र, पीएफ रकमेवरील व्याज अद्याप खात्यात जमा झालेले नाही.

पीएफ खातेधारक ट्विटद्वारे ईपीएफओकडे तक्रारी करत आहेत. अशाच एका तक्रारीवर ईपीएफओने व्याजाची रक्कम जमा करण्यासंबंधी उत्तर दिले आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी पीएफवर मिळणारे व्याज ८.१ टक्के निश्चित केले आहे. (Latest Marathi News)

खात्यात लवकरच जमा होणार व्याजाची रक्कम

EPFO ने ट्विटरद्वारे सांगितले की, व्याजाची रक्कम ट्रान्सफर करण्यासंबंधीची प्रक्रिया सुरू आहे. पीएफ खातेधारकांच्या खात्यात ही रक्कम लवकरच जमा होईल. व्याजाच्या रकमेचा पूर्ण भरणा केला जाणार आहे. खातेधारकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. जवळपास साडेसहा कोटी खातेधारकांना असलेल्या व्याजाच्या रकमेची प्रतीक्षा संपणार आहे.

पीएफच्या नियमांत बदल

पीएफच्या नियमांमध्ये झालेल्या बदलांसंदर्भात सांगायचे झाले तर, सरकारने १ फेब्रुवारी २०२३ रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतानाच, ईपीएफची रक्कम काढण्यासंदर्भात दिलासा देणारी घोषणा केली आहे. नव्या नियमांनुसार, पीएफमध्ये जमा झालेली रक्कम काढल्यावर टीडीएस कपात ३० टक्क्यांवरून कमी करून २० टक्के केली आहे.

सरकारच्या या निर्णयाचा थेट फायदा अशा खातेधारकांना होणार आहे, ज्यांचे पॅन कार्ड पीएफ अकाउंटमध्ये अपडेट झालेला नाही. आतापर्यंत जर कोणाचा पॅन कार्ड EPFO च्या रेकॉर्डमध्ये अपडेट करण्यात आलेला नाही, त्यांनी पैसे काढल्यास त्यावर ३० टक्के टीडीएस भरावा लागत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worst foods to eat with eggs: चुकूनही अंड्यासोबत हे ५ पदार्थ नाश्त्यामध्ये खाऊ नका

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट

Local Body Election: प्रचार जोरात होणार! इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, आयोगाने घेतला सर्वात मोठा निर्णय

Halloween : हॅलोवीन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आणि का? जाणून घ्या

Mulher Fort History: ट्रेकिंगसाठी ठरेल परफेक्ट किल्ला! मुल्हेर किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

SCROLL FOR NEXT