दिल्ली हायकोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटकेपासून दिलासा देण्याची याचिका फेटाळली. त्यानंतर आज गुरुवारी सायंकाळी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. सायंकाळच्या सुमारास ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं. त्यानंतर दारु घोटाळा प्रकरणी हाऊस सर्च वॉरंट जारी केलं. या प्रकरणात आप खासदार संजय सिंह आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे आधीपासून तुरुंगात आहेत. (Latest Marathi News)
दिल्ली सरकराने १७ नोव्हेंबर २०२१ मध्ये नवीन मद्य विक्री धोरण लागू केलं होतं. या धोरणांतर्गत राजधानी दिल्लीला ३२ झोनमध्ये विभागलं होतं. प्रत्येक झोनमध्ये २७ दुकाने उघण्याविषयी धोरणात म्हटलं आहे. यानुसार संपूर्ण दिल्लीत ८४९ मद्य विक्रीचे दुकाने उघडण्यात येणार होते.
या धोरणानुसार, सर्व सरकारी कंत्राट बंद करून सर्व मद्य विक्रीचे दुकाने खासगी करण्यात येणार होती. या धोरणाआधी दिल्लीत ६० टक्के मद्य विक्री दुकाने हे सरकारी होते. तर ४० टक्के दुकाने हे खासगी स्वरुपातील होते. मात्र, नव्या धोरणानुसार दिल्लीतील १०० टक्के दुकाने हे खासगी करण्यात येणार होते. या धोरणामुळे दिल्ली सरकारला ३५०० कोटी रुपयांचा फायदा होणार होता.
या धोरणानुसार, दिल्ली सरकारने मद्य विक्रीच्या दुकानाच्या लायन्ससची किंमत अनेक पटींनी वाढवली होती. या धोरणानुसार एल-1 लायन्सस मिळविण्यासाठी २५ लाख रुपये द्यावे लागणार होते. तर नव्या धोरणानुसार कंत्राटदारांना पाच कोटी रुपये द्यावे लागत होते. इतर कॅटेगिरीतील लायन्सस फी देखील वाढविण्यात आली होती.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून गेल्या वर्षी २ नोव्हेंबरला पहिलं समन्स पाठवण्यात आलं होतं. हे समन्स प्रिवेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्टनुसार पाठवण्यात आलं होतं. ईडीकडून आरोप करण्यात आलं होता की, महसूल धोरणाची तयारी २०२१-२०२२ मध्ये करण्यात येत होती. त्यावेळी केजरवाल हे आरोपींच्या संपर्कात होते. ईडीचा दावा आहे की, या प्रकरणात भारत राष्ट्र समितीचे नेते देखील आहेत.
या प्रकरणात के कविता यांचा अकाऊंटंट बुची बाबू यांचा जबाब देखील नोंदविण्यात आला आहे. बुची बाबू यांनी जबाबात म्हटलं की, 'के कविता, मनिष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल यांच्यात या धोरणाबाबत आधीच चर्चा झाली आहे. या धोरणावरून के कविता यांनी २०२१ मध्ये विजय नायर यांच्याशी चर्चा केली होती.
या प्रकरणात अटकेत असलेले दिनेश अरोडा यांनी ईडीला सांगितलं की, मी या धोरणाबाबत अरविंद केजरीवाल यांच्याशी त्यांच्या शासकीय निवासस्थानी चर्चा केली. तसेच अरोडा यांनी सांगितलं की, 'वायएसआर कांग्रेसचे खासदार मंगुटा श्रीनिवासुलु रेड्डी आणि अरविंद केजरीवाल यांच्यातही अनेकदा चर्चा झाल्या आहेत. यानंतर दिल्लीतील मद्य विक्री धोरणात रेड्डी यांचंही स्वागत करण्यात आलं होतं'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.