Lok Sabha Election 2024 : भाजपची लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी? कुणाला दिला डच्चू?

Lok Sabha Election 2024 /BJP Tamil Nadu Seat : लोकसभा निवडणुकाची रणधुमाळी सुरू झाली असून भाजपने उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली. यात तामिळनाडूतील ९ जागांचा समावेश आहे. तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. आण्णामलाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Saam Digital
Published On

Lok Sabha Election 2024

लोकसभा निवडणुकाची रणधुमाळी सुरू झाली असून भाजपने उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली. यात तामिळनाडूतील ९ जागांचा समावेश आहे. तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. आण्णामलाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चेन्नई साऊथमधून टी सुंदरराजन, चेन्नई सेंट्रलमधून विनोज पी सेल्वन, वेल्लूरमधून ए. सी. शानमुगन, कृष्णगिरी मतदारसंघातून सी. नरसिम्हा, निलगिरी या राखीव मतदारसंघातून एल मुरुगन, पेरांबलूरमधून टी. आर. पेरिवेंदर, थुथूकुडीमधून नैनार नेगंद्रन, कन्याकुमारीतून पोन राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत 276 उमेदवारांची नावे जाहीर केली असून, उर्वरित उमेदवारांची नावेही पक्ष लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाने सर्वप्रथम १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यानंतर पक्षाकडून 72 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. आता पक्षाने तिसऱ्या यादीत 9 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपने दोन यादीतील २१ टक्के खासदारांची तिकिटे कापली आहेत. तिसरी यादी जाहीर करण्यापूर्वी भाजपने दोन याद्यांमध्ये 267 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. ज्यात पक्षाने 21 टक्के विद्यमान खासदारांची तिकिटे कापली होती. दोन्ही यादीतून भाजपने 63 विद्यमान खासदारांची तिकिटे कापली, त्यापैकी 2 जणांनी स्वतः निवडणूक लढवण्यास नकार दिला होता.

Lok Sabha Election 2024
Akola Lok Sabha Constituency History: अकोल्यात कोण बाजी मारणार? या लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय?

चेन्नई सेंट्रल – तमिलिसाई सौंदर्यराजन

नीलगिरी – एल मुरुगन

कोयंबटूर – ए अन्नामलाई

चेन्नई सेंट्रल – विनोज पी सेल्वम

वेल्लोर- एसी शम्मुगम

कृष्णगिरि- सी नरसिम्हा

पेराम्बलुर – टी आर पारिवेंदर

थुथुक्कुड़ी – नेनार नागेंद्रन

कन्याकुमारी- पोन राधाकृष्णन

Lok Sabha Election 2024
Maharashtra Lok Sabha Election : ...तरी मी आधीपासूनच हुशार; मुरलीधर मोहोळ यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com