देश विदेश

Crowdfunding Explainer: क्राउडफंडिंग म्हणजे काय? देशाच्या नावावर काँग्रेस का मागत आहे देणग्या, जाणून घ्या सर्व बाबी

What is Crowdfunding : काही दिवसांपूर्वी चार राज्यातील विधानसभा निवडणुकींचा निकाल लागला. या निवडणुकीत काँग्रेसचा तीन राज्यात मोठा पराभव झाला. यानंतर काँग्रेस कामाला लागली असून ऑनलाइन पद्धतीने देणगी घेण्यास सुरूवात केलीय. परंतु क्राउडफंडिंग नेमकं काय आहे, हा प्रश्न अनेकांना पडलाय. ही फंडिंग का केली जाते, काय असतात नियम याची माहिती जाणून घेऊ.

Bharat Jadhav

What is Crowdfunding Explainer:

क्राउडफंडिंग चा शब्द तेव्हा चर्चेत आला जेव्हा काँग्रेसने पराभवानंतर कामाला लागताना देशातील नागरिकांना देणगी देण्याचे आवाहन केलं. तीन राज्यातील पराभवानंतर काँग्रेसने क्राउडफंडिग करण्यास सुरुवात केलीय. देशात होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार अभियानाला ताकद देण्यासाठी काँग्रेसने देणग्या घेणं सुरू केलं. जनतेकडून पक्ष देणगी घेणार असल्यानं काँग्रेसकडे पैसे नाहीत का? हे जाणून घेणार आहोत. (Latest News)

काँग्रेसने ऑनलाइन पद्धतीने देणग्या घेण्यास सुरुवात केली असून या अभियानाला एक आकर्षक टॅगलाईन दिलीय. एका चांगल्या देशासाठी काँग्रेसला तुमची गरज आहे. भारताला तुमची गरज आहे. ही क्राउडफंडिंग मोहीम स्वतंत्र भारतातील सर्वात मोठी मोहीम असल्याचं काँग्रेस म्हणत आहे. काँग्रेस या देणग्याचं काय करणार आहे. हे जाणून घेणार आहोत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय असते क्राउडफंडिंग

जेव्हा कोणी व्यक्ती किंवा संघटना कोणत्या प्रकल्पासाठी, किंवा व्यवसायासाठी तसेच कोणत्या सामाजिक कार्यासाठी सामन्य लोकांकडून छोटी-छोटी रक्कम जोडते त्याला क्राउडफंडिंग म्हटलं जातं. यासाठी कोणत्या क्राउडफंडिंग वेबसाइट अॅप किंवा इतर दुसऱ्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो.

या अभियानात पैसे जोडणारा व्यक्ती किंवा संस्था आपल्या गुंतवणूकदारांना या देणग्याचं कारण सांगत असते. तसेच या अभियानात कशाप्रकारे योगदान दिले जाईल, हेही सांगत असतो. जेव्हा कोणतं नैसर्गिक संकट येत असतं, किंवा इतर कोणते वैद्यकीय खर्च होत असतं. त्या खर्चचा भार कमी करण्यासाठी क्राउडफंडिंग घेतली जाते. क्राउडफंडिंग, असं कोणीही करू शकत नाही. यासाठी काही नियम आहेत. कोण किती देणगी देणार, किंवा कोण देगणी देऊ शकणार याचेही नियम आहेत.

काँग्रेस का मागतेय देणगी

काँग्रेस पक्ष क्राउडफंडिंगच्या माध्यमातून एका दगडात दोन पक्षी मारण्याच्या प्रयत्नात आहे. काँग्रेसला पक्ष चालवायचा आहे, त्यासाठी पैसे जोडत आहे. यासोबत काँग्रेस देशातील नागरिकांशी जुडण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस पक्ष १८ ते २८ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन देणगी स्वीकारणार आहे. त्यानंतर थेट देगणी घेतली जाईल.

२८ डिसेंबरला काँग्रेस पक्ष आपला स्थापना दिवसानंतर कार्यकर्त्यांना नागरिकांच्या घरोघरी पाठवणार आणि त्यांच्याकडून देणगी घेणार. काँग्रेस प्रत्येक बुथवरून १० घरांना लक्ष्य करत कमीत-कमी १३८ रुपयांची देणगी घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

SCROLL FOR NEXT