PM Modi News: संसदेतील घटनेमागे कोण आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचं : पंतप्रधान मोदी

Prime Minister Modi : पंतप्रधान मोदींनी संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याची घटना चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. या घटनेमागील हेतू जाणून घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणालेत. पीएम मोदींनी यासह कलम ३७० आणि राम मंदिरासारख्या मुद्द्यांवरही भाष्य केलं.
PM Modi News: संसदेतील घटनेमागे कोण आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचं : पंतप्रधान मोदी
Published On

Prime Minister Modi On Parliament Security Breach :

संसदेच्या सुरक्षेचा भंगप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया देत ही घटना दुखद असल्याचं म्हटलंय. याप्रकरणी वाद-विवाद करू नये. या घटनेमागे कोण आहे, याचा तपास केला गेला पाहिजे. त्यांचा उद्देश काय होता हे जाणून घेणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत. (Latest News)

पंतप्रधान मोदींनी (Prime Minister) एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती, त्यावेळी त्यांनी संसदेच्या सुरक्षेतील चूक आणि काश्मीरमधील कलम ३७०, राम मंदिरवर (Ram Temple) भाष्य केलं. संसदेत (Parliament) घडलेली घटनेमुळे आपल्या देशाची प्रतिमा मलीन होते, त्यावर परिणाम होतो. यासह अशा घटना चिंताजनक आहेत. यामुळे घटनेच्या खोलात जाणं आवश्यक आहे. ही घटनामागे कोण आहे, जाणून घेणं आवश्यक आहे. या घटनेमागील काय उद्देश होता. आरोपींचा हेतू काय होता, हे जाणून घेतल्यानंतर आपल्यासमोर सर्व चित्र स्पष्ट होईल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२२ जानेवारीला राम मंदिरचं उद्घाटन होणार असून हा दिवस खास आहे. २२ जानेवरारी हा दिवस १४० कोटी जनतेसाठी आनंदाचा दिवस आहे. वर्षानुवर्षे लोक या दिवसाची वाट पाहत होते. अखेर तो दिवस येणार आहे. तसेच या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी चार राज्यातील निकालावरही भाष्य केलं. यावेळी त्यांनी मोदींची हमी म्हणजे धोरण, हेतू, नेतृत्व आणि ट्रॅक रेकॉर्ड, असल्याचं म्हटलं.

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपने मोठा विजय मिळवला. यावर बोलताना मोदी म्हणाले, मी मेहनत करतो आणि जनता माझ्या झोळीत मते टाकून देतात. जनतेसाठी काम करणं हे माझी प्राथमिकता आहे. त्यांचे जीवन चांगले बनवण्यास प्रयत्न करत असल्याचे मोदी म्हणाले.

कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयानेही नुकतीच आपली भूमिका स्पष्ट केली. कलम ३७० आता भूतकाळातील गोष्ट बनली आहे. ते कधीच परत येणार नाही. विश्वातील कोणतीच शक्ती कलम ३७० परत आणू शकत नाही, असं मोदी म्हणाले.

PM Modi News: संसदेतील घटनेमागे कोण आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचं : पंतप्रधान मोदी
Surat Diamond Bourse: PM नरेंद्र मोदींनी गुजरातला दिली मोठी भेट; 'सुरत डायमंड बोर्स', विमानतळ टर्मिनलचं उद्घाटन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com