Alert In Jammu Kashmir: पाकिस्तानचा पुन्हा नापाक कट ! लॉन्चपॅडवर २५०- ३०० दहशतवादी; लष्कराचे जवान हाय अलर्टवर

Jammu Kashmir : बीएसएफचे महानिरीक्षक अशोक यादव यांनी पुलवामा जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीनुसार, २५०-३०० दहशतवादी लॉन्चपॅडवर उपस्थित आहेत. आम्ही आणि लष्कराने सर्व संवेदनशील भाग ताब्यात घेतला असून सतर्क आहोत. घुसखोरीचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्याचा आम्हाला विश्वास आहे, असे ते म्हणाले.
Jammu Kashmir
Jammu KashmirANI File
Published On

Alert In Jammu kashmir:

भारताच्या सीमेवर असलेल्या लॉन्चपॅडवर २५० ते ३०० दहशतवादी दाखल झाले आहे. भारतात घुसखोरी करणार असल्याची माहिती गुप्तहेर यंत्रणेने दिलीय. बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुप्तचर यंत्रणेचा हवाल्याने ही माहिती दिलीय. या अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे. सीमेपलीकडून घुसखोरीचा कोणताही प्रयत्न हाणून पाडला जाईल, असं अधिकाऱ्याने सांगितलं. (Latest News)

बीएसएफचे आयडी अशोक यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, पुलवामामध्ये दहशतवादी हालचाली दिसून आल्या आहेत. या हालचाली पाहून बीएसएफ आणि आर्मीच्या जवानांना संवेदनशील विभागात नजर ठेवण्यास आणि सतर्क राहण्यास सांगितलं आहे. मागील काही महिन्यात सुरक्षा दल आणि काश्मीरच्या नागरिकांमधील संबंध सुधारलेत. जर नागरिकांनी आम्हाला मदत केली तरी विकासकामे चांगल्या पद्धतीने पुढे जातील. लष्कराचे शूर जवान सीमा भागात सतर्क आहेत. घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांचे कट हाणून पाडतील, असा विश्वास असल्याचं यादव म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन चकमकीत ६ दहशतवादी मारले गेले

गेल्या २४ तासांत जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दोन चकमकी झाल्या. यात ६ दहशतवादी मारले गेले. पहिली चकमक १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी कुलग्राममध्ये सुरू झाली. यामध्ये ५ दहशतवादी मारले गेले. तर दुसरी चकमक राजौरी येथे झाली ज्यात सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले.

Jammu Kashmir
Indian Navy: अरबी समुद्रात मालवाहू जहाज अपहरणाचा प्रयत्न; भारतीय नौदलाने उधळून लावला कट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com