abhishek banerjee  saam tv
देश विदेश

माजी मुख्यमंत्र्यांच्या भाच्यावर हल्ला; राजकारणात खळबळ

abhishek banerjee : पश्चिम बंगालमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या भाच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेने राजकारणात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

पश्चिम बंगालमध्ये मोठा गोंधळ

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला

अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याने सर्वत्र खळबळ

पश्चिम बंगालच्या राजकारणातून मोठी बातमी हाती आली आहे. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर आंदोलकांनी हल्ला करण्यात आला आहे. अभिषेक यांच्यावर हल्ला झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर पश्चिम बंगालच्या सोनारपूरमध्ये हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर अभिषेक बॅनर्जी यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे बाहेर काढलं. यावेळी अभिषेक बॅनर्जी यांनी हेल्मेट घातल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्या अवतीभवती सुरक्षा कर्मचारी होते.

रस्त्यावरून खासदार अभिषेक यांची एन्ट्री होताच भाजप कार्यकर्ते 'चोर चोर' घोषणाबाजी करू लागले. अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला करताना आंदोलकांनी त्यांचे कपडे फाडले. काही जणांनी त्यांच्यावर अंडी फेकून मारल्याचे सांगण्यात येत आहे.

आंदोलनामुळे खासदार बॅनर्जी हे स्वत:ची कार सोडून दुचाकीने दुसरीकडे गेले. आंदोलनकर्त्यांनी त्यांना घरी जाण्यापासूनही रोखण्याचा प्रयत्न करत होते. आंदोलकांनी खासदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आक्रमक जमावाने रस्त्यावरील दुचाकी पाडल्या. या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

स्थानिक नागरिकांनी काय म्हटलं?

स्थानिक नागरिकांनी म्हटलं की, 'आम्ही मजूर लोक आहेत. आम्ही कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. आमच्या पैसै खाल्ले आहेत. आम्ही लोक आताही त्रस्त आहेत. त्यामुळे आम्ही भडकलो'. दुसऱ्याने म्हटलं की, 'आम्ही भाजपचे कार्यकर्ते नाहीत. आम्ही येथील स्थानिक नागरिक आहेत. आम्ही दीघा भागातील आहेत'.

लोकांचं म्हणणं आहे की, 'ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होत्या. त्यावेळी त्यांना रस्त्याचा प्रश्न सोडवणे आणि पाण्याची व्यवस्था सुधारण्याची मागणी केली होती. परंतु आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT