मिथुन चक्रवर्ती यांची पश्चिम बंगाल सरकारच्या सल्लागारपदी नियुक्ती
मिथुन चक्रवर्ती यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा
भाजपकडून मिथुन चक्रवर्ती यांच्यावर मोठी जबाबदारी
८० च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणारे अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना पश्चिम बंगाल सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका देण्यात आलीय.पश्चिम बंगाल सरकारने अभिनेते आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवलीय. भाजपनं त्यांची पश्चिम बंगाल सरकारचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही भूमिका माहिती आणि सांस्कृतिक कार्य विभागाशी संबंधित असणार आहे. (Mithun Chakraborty Gets Key West Bengal Government Role With Cabinet Minister Rank)
या पदासोबतच त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जाही देण्यात आलाय. ही नियुक्ती त्वरित लागू झाली असून पुढील आदेशापर्यंत ती कायम राहणार आहे. मिथुन चक्रवर्ती हे बंगाली राजकारणात दीर्घकाळापासून सक्रिय असून त्यांनी भाजपसाठी प्रचारही केलाय. आता त्यांना राज्य सरकारमध्ये एक भूमिका देण्यात आलीय. राज्यातील माहिती, संस्कृती आणि कला क्षेत्रांशी संबंधित बाबींचे कामकाज 'माहिती आणि सांस्कृतिक कार्य विभाग' पाहतो. मिथुन यांची या विभागाचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
मिथुन चक्रवर्ती आता माहिती आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सल्लागार म्हणून काम पाहतील. यापूर्वी ही जबाबदारी सुवेंदू अधिकारी यांच्याकडे होती. आता मिथुन चक्रवर्ती यांची सरकारी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, या विभागाशी संबंधित बाबींवर सरकारला सल्ला देणे ही त्यांची भूमिका असेल. सरकारी अधिसूचनेनुसार, ही नियुक्ती त्वरित लागू झाली आहे. पुढील आदेशापर्यंत ती कायम राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.