West Bengal News Coal mine explosion Saam TV
देश विदेश

Coal mine explosion : कोळसा खाणीत भीषण स्फोट, ७ कामगार जागीच ठार, घटनेचा थरारक VIDEO

West Bengal News Coal mine explosion : पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात कोळसा खाणीत स्फोट होऊन ७ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी असल्याची माहिती आहे.

Satish Daud

पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात ७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात येत आहे.

लोकपूर पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या कोळसा खाणीत हा स्फोट झाला असून यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बीरभूम जिल्ह्यात कोळसा खाण आहे. गंगारामचक मायनिंग प्रायव्हेट लिमिटेड कोलियरी (जीएमपीएल) असे या खाणीचे नाव आहे. या खाणीत परिसरातील शेकडो कामगार काम करतात. सोमवारी सकाळी देखील अनेक कामगार कामावर आले होते.

यावेळी कोळसा क्रशिंग दरम्यान खाणीत भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, आसपासचा परिसर हादरला. जवळपास दोन ते तीन किलोमीटर स्फोटाचा आवाज ऐकू आला. या स्फोटात ५ कामगार जागीच ठार झाले. तर दोन कामगारांचा रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाला. स्फोटात अनेक कामगार देखील जखमीही झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

कोळसा क्रशिंगसाठी कोळसा खाणीत ब्लास्टिंग करत असताना अनावधानाने हा स्फोट झाल्याची प्राथामिक माहिती आहे. स्फोट होताच अनेक कर्मचारी तसेच कामगारांनी खाणीतून पळ काढला आहे. सध्या स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून उर्वरित कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात येत आहे. याशिवाय भाजपचे स्थानिक आमदारही घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. पोलीस मृतांच्या कुटुंबीयांची माहिती गोळा करून त्यांच्याशी संपर्क साधत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

SCROLL FOR NEXT