Firefighters battle massive blaze at a government building in Kolkata where 4000 EVM machines were destroyed. saam tv
देश विदेश

सरकारी इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी; 4000 EVM मशीन जळून खाक, राजकीय वर्तुळात संशयाचा धूर

4000 EVM Machines Burnt In West Bengal Fire Investigation: पश्चिम बंगालमध्ये सरकारी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत तब्बल 4000 EVM मशीन जळून खाक झाली आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

Omkar Sonawane

पश्चिम बंगालमध्ये एका सरकारी इमारतीला लागलेल्या आगीमध्ये तब्बल 4000 EVM मशीन जाळून खाक झाल्या. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत याच EVM मशीन वापरण्यात आल्या होत्या. याबाबत मंत्री कौशिक चौधरी यांनी माहिती दिली. तसेच या प्रकरणी एफआयआर दाखल झाली असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कोलकाताच्या अलीपूर येथील इमारत बुधवारी आगीच्या भक्षस्थानी पडली. या इमारतीमध्ये इतर विभागांव्यतिरिक्त जिल्हा परिषदेचे कार्यालयही होते. यामध्ये तब्बल 4000 EVM जळून खाक झाले. यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान 10 मतदारसंघांमध्ये या EVM चा वापर करण्यात आला होता, असे आपत्कालीन मंत्री कौशिक चौधरी यांनी सांगितले. तसेच मंत्री चौधरी यांनी घटनास्थळाची पाहणी देखील केली, ही आग सामान्य वाटत नाही, यामध्ये काही घातपात झाला होता का, याचा आम्ही तपास करत आहोत असे ते म्हणाले, ही आग नवव्या आणि दहाव्या मजल्यापर्यंत कशी पोहोचली असाही संशय देखील त्यांनी व्यक्त केला.

या प्रकरणाचा तपास केला जाईल अधिक माहितीसाठी आपल्याला फॉरेन्सिक टीमची वाट पाहावी लागेल असे मंत्री कौशिक चौधरी म्हणाले. ही आग लागून 24 तास उलटले असून अजूनही आग विझवण्यात अग्निशनम दल शर्थीचे प्रयत्न करत आहे.

अपघात की घातपात

अधिकाऱ्यांनी सांगितले की, फॉरेन्सिक टीम लवकरच घटनास्थळी येऊन नमूने तपासणीसाठी घेऊन जाईल. फॉरेन्सिकच्या रिपोर्टनंतरच ही आग लागली होती की कोणी लावली होती हे स्पष्ट होईल. मात्र या प्रकरणामुळे पश्चिम बंगालमध्ये राजकारण चांगलंच तापलं असून केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांनी देखील संशय व्यक्त केला. घातपाताची शक्यता नाकारता येत नाही असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Risk: पोटावरील चरबीमुळे वाढतोय मधुमेहाचा धोका, डॉक्टरांनी सांगितली धक्कादायक माहिती

Cup Bashi Movie: माझी आणि माझ्या सासूची पत्रिका जुळली पाहिजे; निर्मिती सावंत- पूजा सावंतच्या 'कप बशी'चा रंजक ट्रेलर प्रदर्शित

Saturday Horoscope: रखडलेली कामे पूर्ण होणार, 5 राशींच्या व्यक्तींची चांदीच चांदी; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics: एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे ठाकरेंच्या खासदाराची महत्त्वाच्या बैठकीला दांडी

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये वीज कोसळून मेंढपाळासह 13 बकऱ्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT