West Bengal CJP activist father death after attack साम टीव्ही मराठी
देश विदेश

CJP कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू, सरकारी शाळेची पोलखोल करणं जीवावर बेतलं; धक्कादायक घटनेने खळबळ

CJP activist West Bengal : पश्चिम बंगालमधील बांकुडा येथे सरकारी शाळेच्या दुरवस्थेचा व्हिडिओ बनवल्याच्या आरोपावरून हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. CJP कार्यकर्त्याच्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

West Bengal CJP activist father death after attack : पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यात सरकारी शाळेतील गैरसोयींचा पर्दाफाश करणे एका वृद्ध व्यक्तीच्या जीवावर बेतले आहे. 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) या संघटनेच्या 'स्कूल ठीक करो' अभियानांतर्गत शाळेतील दुरावस्थेचा व्हिडिओ बनवल्याच्या रागातून घरात घुसून करण्यात आलेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाला. जनाब माफिक असे मृत वृद्धाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नक्की काय घडले?

CJP कार्यकर्ते शेख अब्दुल हाफीज यांचे वडील जनाब माफिक यांनी १३ ऑगस्ट रोजी करिसुंडा गावातील सरकारी शाळेतील कचरा आणि दुरवस्थेचे चित्रीकरण केले होते. हाच राग मनात धरून त्याच रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास काही लोकांनी त्यांच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्यांनी मोबाईलमधील शाळा आणि जंतर-मंतरवरील आंदोलनाचे व्हिडिओ जबरदस्तीने डिलीट केले.

व्हिडिओ बनवण्यावरून वाद घालत हल्लेखोरांनी धारदार शस्त्रे आणि काठ्यांनी अब्दुल हाफीज आणि त्यांच्या वृद्ध वडिलांवर जीवघेणा हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जनाब माफिक यांचा १५ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

स्थानिक भाजप कार्यकर्त्यांवर आरोप

अब्दुल हाफीज यांनी स्थानिक भाजप नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर या हल्ल्याचा थेट आरोप केला आहे. "रुग्णालयात आणि पोलीस ठाण्यात जात असतानाही हल्लेखोरांनी आम्हाला घेरले आणि भविष्यात असे व्हिडिओ बनवल्यास जीवे मारण्याची धमकी दिली," असा गंभीर आरोप हाफीज यांनी केला आहे.

न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही: अभिजित दीपके

या घटनेवर CJP चे संस्थापक अभिजित दीपके यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "अब्दुल आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही," असे सांगत CJP चे एक विशेष पथक लवकरच पश्चिम बंगालचा दौरा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SIR मोहिमेचा आज शेवटचा दिवस, कोणत्या पक्षाने किती BLO नेमले; धक्कादायक आकडेवारी समोर

Harihar Fort : ट्रेकर्सच्या काळजाचा ठोका चुकवणारा हरिहर किल्ला, ११७ कातळ पायऱ्यांमागचं रहस्य जाणून घ्या

'मुन्नाभाई MBBS' फेम बॉलिवूड अभिनेत्याच्या कारचा गोव्यात भीषण अपघात; बाप-लेकाला उडवलं, VIDEO व्हायरल

Appendix cancer: पोट फुगीमागे लपलाय अपेंडिंक्सचा कॅन्सर? 'ही' 5 लक्षणं दिसली तर समजा सुरुवात झालीये

UGC NET 2026: ३ विषयांची फेरपरीक्षा होणार; प्रश्नपत्रिकेतील गोंधळानंतर NTA ची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT