पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये सुरूवातीच्या ट्रेंडमध्ये सत्तांतराचे संकेत मिळत आहेत. ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच एका ठिकाणी पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. हे सुरूवातीचे कल असले तरी हा ममतांना धक्का मानला जात आहे. पश्चिम बंगालमधील भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत. नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारी तब्बल ३ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बालेकिल्ला असलेल्या भवानीपूरमध्येच पिछाडीवर आहेत. भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी या ठिकाणी आघाडी घेतली आहे. सुवेंदू अधिकारी दोन्ही जागेवर आघाडीवर दिसत आहेत. भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन्ही ठिकाणी सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत. दरम्यान, तामिळनाडूमध्ये डीएमके ५९ जागांवर आघाडीवर आहे, त्याखालोखाल टीव्हीके १६ आणि एआयएडीएमके ३ जागांवर आहेत. तर भाजप आणि काँग्रेस या टप्प्यावर कोणत्याही जागेवर आघाडीवर नाहीत. इतर पक्ष ५ मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहेत.
सुरुवातीच्या कलांनुसार बंगालमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. पण ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीकडून जोरदार टक्कर मिळत आहे. दोन्ही पक्षांमध्ये फारसा फरक नाही. टीएमसी ११० तर भाजप ११६ जागांवर आघाडीवर दिसत आहे. प्रसारमाध्यांच्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत चुरशीची लढत दिसत आहे. मतमोजणी सुरू असताना सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर भाजपची किंचित आघाडी आहे. पण हा काही अंतिम निकाल नाही, हा फक्त सुरूवातीचा कल आहे. निवडणूक आयोगाने अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील प्रत्येक मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. एका मतमोजणी केंद्रावर किरकोळ तणाव निर्माण झाल्याचे वृत्त आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या एजंटांनी प्रवेश नियमांवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. सध्या सर्व मतदान केंद्रावर मतमोजणी सुरू आहे. थोड्याच वेळात पश्चिम बंगालचा कौल कुणाच्या बाजूने हे स्पष्ट होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.