Darjeeling landslide tragedy: Villages submerged, 17 dead, roads to Sikkim and Siliguri cut off. saam tv
देश विदेश

Darjeeling Landslide: दार्जिलिंगमध्ये भूस्खलन,17 जणांचा मृत्यू

Darjeeling Disaster:दार्जिलिंगमधील सात ठिकाणी भुस्खलन झाल्याची घटना घडलीय. अनेक गावे पाण्याखाली गेलीत. जोरदार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. या भूस्खलनात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झालाय.

Bharat Jadhav

  • दार्जिलिंगमध्ये सात ठिकाणी भूस्खलन होऊन १७ जणांचा मृत्यू.

  • मुसळधार पावसामुळे अनेक गावे पाण्याखाली गेलीत.

  • सिक्किम व सिलीगुडी-मिरिक रस्त्यांचा संपर्क खंडित.

उत्तराखंडनंतर आता पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्य्ये भुस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. या भूस्खलनात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झालेत. जोरदार पावसामुळे धरणांमधील पाणी पातळी वाढत आहे. जोरदार पावसामुळे या भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जातंय. सिक्किमशी जोडल्या गेलेल्या रस्त्याचा संपर्क तुटलाय. सिलीगुडी-मिरिकचा थेट संपर्कही खंडित झालाय.

ऋषिखोला आणि पेडांग येथे भूस्खलनामुळे अनेक रस्त्यांवर वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आलीय. दार्जिलिंगमधील या आपत्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दु:ख व्यक्त केलंय. राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस होत आहे. भूतानच्या वांगचू नदीची वाढती पाण्याची पातळी बंगालच्या लोकांसाठी धोका निर्माण झालाय. भूतानच्या अधिकाऱ्यांनी धोक्याचा इशारा दिलाय.

भूतान बंगालच्या उत्तरेला बंगाल आहे, त्यामुळे उत्तर बंगालमध्ये अडचणी वाढण्याची शक्यता जास्त निर्माण झालीय. वांगचू नदीचे खालच्या दिशेने वाहणारे पाणी बंगालच्या जलपाईगुडी आणि कूचबिहार जिल्ह्यांना प्रभावित करेल. भूतानकडून धोक्याता इशारा आलाय पण इशारा दार्जिलिंगमध्ये जोरदार पावसामुळे अनेक भाग जलमग्न झालाय.

भूस्खलनामुळे सिक्किमधील रस्त्याचा संपर्क तुटलाय. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक अडकलेत. या आपत्तीत आतापर्यंत सुमारे १७ जणांचा मृत्यू झालाय. हवामान खात्याने पाऊस आणि पूर यासंदर्भात रेड अलर्ट जारी केलाय. रस्ते वाहून गेल्याने सिलीगुडी-मिरिक यांचा थेट संपर्क तुटलाय. जोरदार पाऊस आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे दुधिया पूल तुटलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : जोडीदाराबरोबर दिलजमाई करावी लागेल; 5 राशींच्या लोकांना जपून पावले उचलावी लागणार

Maharashtra Politics: शिंदेसेनेचा नगराध्यक्ष भाजपनं पळवला, दिल्लीवारीनंतरही शिंदेंची कोंडी सुरुच

शिर्डीत झाडावर अवतरले साई? साईंच्या दर्शनासाठी उसळली गर्दी

स्मृती मंधाना-पलाशचं लग्न कुणामुळं पुढं ढकललं? संगीत सोहळ्याच्या रात्री काय घडलं? नवरदेवाच्या आईनं खरं कारण सांगितलं

Car Accident: भरधाव कारवरचा कंट्रोल सुटला, भीषण अपघातात IAS अधिकाऱ्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT