Accident News
Accident News Saam Tv
देश विदेश

धक्कादायक! पश्चिम बंगालमध्ये पिकअप व्हॅनला विजेचा धक्का लागून 10 ठार, अनेक जखमी

वृत्तसंस्था

पश्चिम बंगाल - कूचबिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री पिकअप व्हॅनमधील 10 जणांना विजेचा धक्का बसला आणि त्यात 10 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती पोलिसांना (Police) मिळताच पोलीस घटनासथळी दाखल झाले. घटनेनंतर लगेचच प्रवाशांना रुग्णालयात (Hospital) दाखल केले. व्हॅनमधील 27 पैकी 16 जणांना या घटनेत किरकोळ दुखापत झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी जलपाईगुडी रुग्णालयात पाठवण्यात आले.

हे देखील पाहा -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅनमधील डीजे सिस्टीमच्या जनरेटरच्या वायरिंगमुळे ही घटना घडली असावी. काल दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मेखलीगंज पीएस अंतर्गत धारला पुलावर एक घटना घडली, तिथे जल्पेशकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या पिक-अप व्हॅनला विजेचा धक्का बसला, अशी माहिती पोलिसांनी दिली. जनरेटर च्या वायरिंगमुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

अपघातग्रस्तना चांगरबांधा बीपीएचसीमध्ये आणण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 27 पैकी 16 जणांना उपचारांसाठी जलपाईगुडी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तर 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

सर्व प्रवासी सितलाकुची पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहेत. वाहन जप्त करण्यात आले असून चालक मात्र फरार आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. मदत आणि आवश्यक मदतीसाठी पोलिस समन्वय साधत आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : ठाण्यात शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं? ठाण्याचा गड राखणं शिंदेंना जड? Politics

Special Report : ठाकरे केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर? केजरीवालांचं नाव घेत भाजप नेत्याचा इशारा

Special Report : Devendra Fadnavis यांचा Dhairyasheel Mohite Patil यांना इशारा

SRH vs RR : नितेश कुमारची वादळी खेळी, ठोकले ८ षटकार; हैदराबादचं राजस्थानसमोर २०२ धावांचं आव्हान

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 मे ला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT