west bengal  Saam tv
देश विदेश

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला; भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या जवळच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या, घटनाक्रम आला समोर

west bengal news : विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला. गेल्या काही दिवसांत राजकीय पक्षांच्या कार्यालयाची तोडफोड सुरू आहे. त्यानंतर आता भाजप नेत्याच्या जवळच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर रक्तरंजित थरार

सुवेंदु अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या

पीएच्या हत्येने राजकीय वर्तुळात खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू

पश्चिम बंगालमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजप नेते शुंभेदु अधिकारी यांचे स्वीय सहायक चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. उत्तर २४ परगना जिल्ह्यात त्यांची चार राऊंड झाडून हत्या करण्यात आली. गोळीबारात चंद्रनाथ आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयात उपचारादरम्यान चंद्रनाथ यांचा मृत्यू झाला. चंद्रनाथ यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रनाथ यांची कार भर रस्त्यात थांबवण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन गाड्या चंद्रनाथ रथ यांच्या कारचा पाठलाग करत होत्या. यात एक कार आणि एका दुचाकीचा समावेश आहे. कारने चंद्रनाथ यांच्या वाहनाला ओव्हरटेक केलं. त्यानंतर दुचाकीवरील हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. आजूबाजूच्या विभागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्याचे काम देखील सुरू करण्यात आलं आहे. प्रत्यक्षदर्शीकडूनही माहिती मिळवण्याचं काम सुरू आहे. दुचाकीवरील क्रमांक नोंदणीकृत नव्हता. चंद्रनाथ यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी गोळ्या झाडल्या.

गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी पंचनामा नोंदवून परिसरात नाकेबंदी सुरू केली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डेटा घेण्याचं काम सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच शुंभेदु अधिकारी देखील रुग्णालयात गेले. शुंभेदु अधिकारी यांनीही मध्यग्राममध्ये झालेल्या गोळीबारात पीए चंद्रनाथ यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

तत्पूर्वी, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर काही ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यालायची जाळपोळ झाली. तर टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : चपाती की भात कशामुळे लवकर वजन वाढत? डॉक्टरसुद्धा करतात अलर्ट

Saturday Horoscope : कसलाही ताण घेऊ नये! पैशाची तंगी जाणवणार नाही, वाचा शनिवारचे राशीभविष्य

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

SCROLL FOR NEXT